Government Job Recruitments Update: Bharti in Union Bank and MahaTranscoc Saam Tv
बिझनेस

Government Job Recruitements: सरकारी नोकरीची संधी; यूनियन बँक, MahaTranscoc मध्ये ७३६ जागांसाठी भरती

Union Bank and MahaTranscoc Job Recruitements: शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक तरुण नोकरीच्या शोधात असतो. तरुण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतात. तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँकेत आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड येथे भरती केली जात आहे.

Shraddha Thik

Government Jobs in Union Bank and MahaTranscoc:

शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक तरुण नोकरीच्या शोधात असतो. तरुण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतात. तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँकेत आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड येथे भरती केली जात आहे.

युनियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

युनियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती केली जात आहे. बँकेने (Bank) अधिकृत वेबसाइटवर (Website) याबाबत माहिती दिली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी तब्बल ६०६ जागांवर भरती करण्यात येणार आहे. युनियन बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर भरती २०२४ साठी ऑनलाइन अर्ज ३ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झाले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे.

युनियन बँकेत अर्ज करण्यासाठी ओपन, ओबीसी, EWAS या श्रेणींसाठी ८०० रुपये अर्ज फी आहे. तर अनुसूचित जाती, जमाती आणि PWD साठी अर्ज शुल्क १७५ रुपये ठेवण्यात आले आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरु शकतात. यासाठी बँकेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MahaTransco) येथे असिस्टंट इंजिनियर पदांसाठी एकूण १३० जागांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरु शकतात. अर्ज भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांना https://www.mahatransco.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड येथे असिस्टंट इंजिनियर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इंजिनियरिंग डिप्लोम किंवा इलेक्ट्रिरल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर शिक्षण असणे महत्त्वाचे आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारंना ७०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर राखीव जाती यांच्याकडून ३५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT