HVF Recruitment 2026 google
बिझनेस

Government Job: १० वी शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

10th Pass Job: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी HVF मध्ये 122 कनिष्ठ तंत्रज्ञ पदांची भरती जाहीर झाली असून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. नुकतीच अवजड वाहनांच्या कारखान्यामध्ये (HVF) रिक्त पदांची भरती झाली आहे. या कंपनीने विविध भागांसाठी जूनियर टेक्नीशियन (Junior Technician) पदाची भर्ती सुरु केली आहे. त्यानुसार नोकरीस पात्र असणारे कर्मचारी या पदासाठी अर्ज करु शकतात.

आर्मर्ड व्हीकल निगम लिमिटेड रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्यामध्ये एक युनिट वाहनांची फॅक्ट्री आहे. यामध्ये तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर लगेचच तुम्ही अर्ज करु शकता. यामध्ये एकूण १२२ कनिष्ठ तंत्रज्ञ पदाची भरती सुरु केली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांना यामध्ये मेकॅनिस्ट, ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, रिगर, हीट ट्रीटमेंट ऑपरेटर, फिटर ऑटो इलेक्ट्रिक तसेच वाळू आणि शॉट ब्लास्टर या पदांचा समावेश आहे. संबंधित पदानुसार कर्मचाऱ्याकडे NAC, NTC किंवा STC प्रमाणपत्र असणं महत्वाचं आहे. काही पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं, तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणंही बंधनकारक असणार आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन नसून ऑफलाइन पद्धतीने करावी लागणार आहे. उमेदवारांनी भरती अधिसूचनेतील परिशिष्ट-अ मधील अर्जाचा नमुना डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी. अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभवाची माहिती अचूकपणे भरावी लागेल. अर्जासोबत दहावीची गुणपत्रिका, NAC/NTC प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. यासोबत ३०० रुपयांचे अर्ज शुल्क भरल्याची पावतीही जोडावी लागणार आहे.

संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित कंपनीच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावा लागेल. या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२६ असून त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

SCROLL FOR NEXT