Swamitva Yojana Saam Tv
बिझनेस

Swamitva Yojana: सरकार नागरिकांना देतंय प्रॉपर्टी कार्ड; स्वामित्व योजना नक्की आहे तरी काय?

Swamitva Yojana Give Property Card: केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेत ग्रामीण भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते. हे तुमचा जमिनीवर कायदेशीर मालकी असल्याचा पुरावा आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नवीन योजना राबवली आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड देण्यात येते. हे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमची जमिनीवर कायदेशीर हक्क असल्याचा पुरावा.ग्रामीण भागातील लाखो कुटुंबासाठी कायदेशीर मालकीचे प्रमाणपत्र देणार आहे.

केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेत ३,४४,००० गावांचे सर्वेक्षण करण्याची उद्दिष्ट आहे. गेल्या चार वर्षात १,३६,००० गावातील लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे. (Swamitva yojana )

ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा नाही आहे. त्यांच्या कुटुंबाला वाडवडिलांकडून ही जमीन मिळते. मात्र, कायदेशीर कागदपत्रे नसल्याने अनेक अडचणी येऊ शकतात. याच अडचणी टाळण्यासाठी नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते.

ज्या नागरिकांकडे जमिनीची अधिकृत कागदपत्रे नाहीत त्या जमिनीवर ग्रामीण बँकांकडून कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फटका बसतो. यामुळे अनेक अडचणी येतात. त्यामुळेच हे प्रॉपर्टी कार्ड दिले जातात. (Swamitva Yojana News)

ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळवून देणे हा यामागचा उद्देश आहे.प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर त्यांना कायदेशीररित्या जमीन आर्थिक मालमत्ता म्हणून वापरता येईल.

स्वामित्व योजनेत ड्रोनचा वापर केला जातो. गावातील जमिनींचे सर्वेक्षण केले जाते.गावांमध्ये मोजमाप करण्यासाठी काही पुरातन पद्धतीचा वापर केला जात होता.त्यामुळे भांडणे होत आहे. GIS तंत्रज्ञानाचा वापर करुन नकाशा तयार केला जातो. यामुळे त्या नागरिकाची जमीन किती हे सहज ओळखू शकतात.

स्वामित्व कार्ड हा जमिनीच्या कारदेशीर मालकीचा पुरावा असणार आहे.यामुळे जमीन तुमच्या नावावर असल्याचा एक महत्त्वाचा पुरावा तुमच्याकडे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT