One District One Product Scheme Saam Tv
बिझनेस

Business Loan : सरकारची जबरदस्त योजना! व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळतंय तब्बल २ कोटींचं कर्ज; असा करा अर्ज

Siddhi Hande

अनेक तरुणांचे स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न असते. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल हे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्हालाही स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सरकार तुम्हाला २ कोटींपर्यंतचे लोन देते. स्थानिक उद्योग, शिल्प, कपडे आणि इतर अनेक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हे लोन दिले जाते. यासाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे वन डिस्ट्रिक्ट, वन प्रोडक्ट. उत्तर प्रदेश सरकारची ही योजना आहे. या योजनेत एक विशिष्ट प्रोडक्ट लक्षात ठेवून लोकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

उत्तर प्रदेश सरकारच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचे लोन दिले जाते. याचसोबत या योजनेत सब्सिडीदेखील दिली जाते. त्यामुळे स्वतः चा व्यवसाय सुरु करणे सोपे होते. (ODOP Scheme)

ही योजना व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेत प्रत्येक जिल्ह्याच्या खास उत्पादनासाठी लोन दिले जाते. जेणेकरुन त्या जिल्ह्यातील स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल.

२० लाखांची सब्सिडी

याचसोबत वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांच्या लोनसोबत २० लाखांची सब्सिडी दिली जाते. यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय विस्तार करण्यासाठी मदत होते.

या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? (One District One Product )

वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ODOP या पोर्टलवर जाऊन रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुमच्या अर्जाची हार्ड कॉपी संबंधित कार्यालयात जमा करायची असते. त्याचसोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि योजनेचा रिपोर्ट यासारखे कागदपत्रेदेखील जमा करावी लागतील. यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार त्यानंतर तुम्हाला लोन दिले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : 'लाडकी बहीण'वरून मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांना नोटिस, पाहा काय आहे प्रकरण

Chiplun Tourism Places: हिरवी झाडी अन् गडकिल्ले, चिपळूणमधील ही ठिकाणे तुम्हाला करतील मनमोहित

Gold -Silver Rate : दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोने-चांदीची झळाळी वाढली, वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Government Job: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; महिना १,६१,००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते देव नदीचे जलपूजन

SCROLL FOR NEXT