ITR News Saam Tv
बिझनेस

ITR News : आता सरकारची नजर तुमच्या रोखीच्या व्यवहारावर; नव्या ITR फॉर्मवर द्यावा लागेल तपशील

ITR: नवीन वर्षाच्या आधीच आयकर विभागाने नवीन आयटीआर फॉर्म प्रसारित केले आहेत. आता सरकार तुमच्या रोखीच्या व्यवहारांवरही लक्ष ठेवेल. आयटीआरच्या अर्जात आपल्याला चालू आर्थिक वर्षातील व्यवहारांमध्ये गुंतलेल्या सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागेल.

Bharat Jadhav

Cash Transactions Details In ITR:

नववर्षात आपल्या सर्वांना मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. सरकार आपल्या मोबाईलपासून ते थेट आपल्या पैशांच्या व्यवहारावर नजर ठेवणार आहे. सरकारने रोखीच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नुकतेच आयकर विभागाने नवीन आयटीआर फॉर्म जारी केलेत. यात रोखीच्या व्यवहारांचा तपशील द्यावा लागेल. इतकेच नाही तर तुम्हाला देशातील सर्व बँक खात्यांचा तपशीलदेखील द्यावा लागेल. या फॉर्ममध्ये ही माहिती भरणे देखील बंधनकारक असेल.(Latest News)

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी नवीन आयटीआर फॉर्म प्रसारित केले आहेत. गेल्या वर्षी नवीन ITR फॉर्म फेब्रुवारीमध्ये प्रसारित केले गेले होते, यावेळी ते डिसेंबरमध्येच आले आहेत. याचाच अर्थ या फार्ममध्ये आपल्याला आर्थिक वर्ष २०२३ २४ मधील आपल्या कमाईचा तपशील भरावा लागेल. असा या फॉर्मचा अर्थ आयकराच्या भाषेत काढला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँक खात्यांची द्यावी लागेल माहिती

सरकार देशातील नागरिकांच्या रोखीच्या म्हणजेच पैशांने होणारे व्यवहार कमी करण्याच्या विचारात आहे. देशभरात डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचे काम सुरू आहे. ते उद्देशासाठी एका दिवासाच्या रोखीच्या व्यवहारावर निर्बंध आहेत. एका दिवसात आपण रोख रक्कम घेण्याची किंवा देण्याची मर्यादा केवळ २ लाख रुपये ठेवण्यात आलीय.

आता आयटीआर फॉर्ममध्येही ही तरतूद करण्यात आली आहे. तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील व्यवहारांमध्ये गुंतलेल्या सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागेल. यासोबतच त्यांना बँक खात्याच्या प्रकाराचीही माहिती द्यावी लागणार आहे. दरम्यान ITR-१ किंवा सहज फॉर्म फक्त त्याच लोकांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे. ज्यांना पगार, घराची मालमत्ता, व्याज किंवा शेतीतून उत्पन्न मिळते.

रोख पैशांची द्यावी लागेल माहिती

जर तुम्ही HUF किंवा कौटुंबिक व्यवसाय किंवा मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये असाल तर. त्यानंतर तुम्हाला ITR-४ किंवा संगम फॉर्म भरावा लागेल. यासाठी एकूण उत्पन्नाची यादी ५० लाख रुपये असेल. इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, या फॉर्ममध्ये तुम्हाला रोख स्वरूपात मिळालेल्या रकमेची माहिती देखील शेअर करावी लागेल.

दरम्यान गेल्या वर्षी सरकारने आयटीआर फॉर्ममध्ये क्रिप्टोकरन्सीमधून किती उत्पन्न मिळते हे विचारण्यात आलं होतं. यंदा रोखीच्या व्यवहारांची माहिती देण्यासाठी नवा तक्ता फॉर्ममध्ये टाकण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT