डिजिटल पेमेंट करण्यासाठी तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत आहात का? जर तुम्ही गूगल पे, फोन पे, पेटीएम, भीम किंवा इतर ऑनलाइन बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्याकडे UPI आयडी असणे आवश्यक असतं. डिजिटल पेमेंट अॅप्सद्वारे पैशांची देवाण-घेवाण करायची असेल तर UPIआयडी आवश्यक असतो. पण युपीआयचा वापर करणाऱ्यांपैकी काही UPI वापरकर्त्यांचा व्यवहार सेवा बंद होऊ शकते. नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेऊ..(Latest News)
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation of India) ने नुकतीच UPI द्वारे एक अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार UPIसक्रिय असणे आवश्यक आहे. जर गेल्या एक वर्षात कोणताही व्यवहार झाला नसेल तर तुमचा UPI आयडी डिअॅक्टिव्ह केला जाईल. तुम्हाला तुमचा UPIआयडी अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करायचा नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे अकाऊंट ३१ डिसेंबरपूर्वी अॅक्टिव्ह करावे लागेल.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डिअॅक्टिव्ह UPI आयडी कसा अॅक्टिव्ह करायचा?
UPI आयडी अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला एखाद्याशी व्यवहार करावा लागेल म्हणजेच पेमेंट किंवा पैशांची देवाण- घेवाण करावी लागेल. तुम्ही तुमच्या UPI आयडीद्वारे बिल पेमेंट, फोन रिचार्ज, भाडे भरणे इत्यादी इतर कोणतेही पेमेंट करू शकता. पण तुम्हाला हे काम ३१ डिसेंबरपूर्वी करावे लागेल. तुम्ही असे न केल्यास, तुमचा UPIआयडी NPCI नियमांनुसार डिअॅक्टिव्ह केला जाईल.
कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होऊ नये, यासाठी NPCI ने UPI ID साठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. युपीआयचा गैरवापर होऊ नये, तसेच पैशांच्या व्यवहारात कोणताच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नवीन मार्गदशक तत्वे जाहीर करण्यात आली होती. जेव्हा लोक त्यांचा फोन नंबर बदलतात तेव्हा ते त्यांच्या जुन्या नंबरवरून चालणारा UPIआयडी बंद करत नाहीत. किंवा ते आयडी बंद करायला विसरतात त्यामुळे बंद केलेला नंबर अनेक महिन्यांपर्यंत दुसऱ्यांच्या नावावर राहतो.
मोबाईल फोन वापरकर्त्याच्या नावावर प्रथम UPI आयडी दिसतो, ज्यामुळे चुकीचे व्यवहार होऊ शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचा नंबर बंद केला किंवा करणार असाल तेव्हा तुम्ही त्या नंबरवरून चालणारा UPI आयडी देखील बंद केला पाहिजे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.