Government Loan Scheme Without Interest Saam Tv
बिझनेस

Government Scheme: ना कोणतेही व्याज, ना गॅरंटी... मिळणार ५ लाखांचे लोन, अट फक्त ८वी पास

Government Loan Scheme Without Interest: उत्तर प्रदेश सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा उद्दमी विकास अभियान योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना कोणत्याही व्याजाशिवाय किंवा गॅरंटीशिवाय लोन मिळणार आहे.

Siddhi Hande

उत्तर प्रदेश सरकारची मुख्यमंत्री युवा उद्दमी विकास अभियान योजना

८वी पास तरुणांना मिळणार ५ लाखांचे लोन

कोणत्याही गॅरंटी किंवा व्याजाशिवाय मिळणार कर्ज

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबततच इतर अनेक राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी योजना सुरु केल्या आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजनांमध्ये सरकार लोन देते. जेणेकरुन मध्यमवर्गीय लोक आपला व्यवसाय सुरु करु शकतात.

उत्तर प्रदेश सरकारने नागरिकांसाठी योजना राबवली आहे. मुख्यमंत्री युवा उद्दमी विकास अभियान योजना सुरु केली आहे. यामध्ये ५ लाखांचे लोन दिले जाते. जेणेकरुन तरुणांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा.

८ वी पास नागरिकांना मिळतो लाभ

जर तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही उत्तम संधी आहे. २१ ते ४० वयोगटातील तरुणांना हे लोन मिळते. यासाठी फक्त ८वी पास असणे आवश्यक आहे. याचसोबत कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून स्किल ट्रेनिंग सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.याचसोबत या योजनेतील लाभार्थ्यांनी पीएम स्वनिधी सोडून कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेचा उद्देश

या योजनेत २१ ते ४० वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात. या तरुणांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळणार आहे. या योजनेत १० वर्षात १० लाख तरुणांना स्वोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.

अर्ज कसा करावा? (Application Process)

या योजनेत तुम्हाला MSME च्या msme.up.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यानंतर फॉर्मच्या पडताळणीसाठी बँकेत पाठवला जाईल. त्यानंतर बँकेत या फॉर्मची पडताळणी केली जाईल. यानंतर लोन दिले जाते.

या योजनेत तुम्हाला कोणतेही व्याजदर द्यावे लागणार नाही. परंतु ४ वर्षाच्या कालावधीत तुम्हाला हे लोन जमा करायचे आहेत. या योजनेत लोनसाठी कोणत्याही गॅरंटीची आवश्यकता नाही. या योजनेत तुम्हाला सर्वात आधी काही पैसे डिपॉझिट करावे लागेल. या योजनेत सरकार १० टक्के मार्जिनदेखील देते. फक्त २ वर्षांसाठी तुम्ही व्यवसाय सुरु ठेवायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev: तुला पाहून मन वेडं झालं...

मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला- शिवाजी सावंत

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; १६२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Silver Rate : सोन्यापेक्षा चांदीने भाव खाल्ला, किंमत ३ लाखांच्या पुढे

SCROLL FOR NEXT