Google Pay Discontinued:  Saam TV
बिझनेस

Google Pay बाबत मोठी अपडेट! जूनमध्ये बंद होणार अ‍ॅप, त्याआधी करा हे महत्वाचं काम

Google Pay Discontinued: Google ने घोषणा केली आहे की, ते 4 जून 2024 रोजी अमेरिकेत Google Pay ॲप बंद करणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Google Pay Discontinued:

Google ने घोषणा केली आहे की, ते 4 जून 2024 रोजी अमेरिकेत Google Pay ॲप बंद करणार आहे. Google Wallet प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून Google ची पेमेंट सुविधा सुलभ करणे हा yach उद्देश आहे.

म्हणजे आता याचे जुने व्हर्जन तेथील मोबाईलमध्ये चालणार नाही. हे ॲप बंद होण्यासोबतच गुगलने पीअर-टू-पीअर (peer-to-peer) पेमेंटही बंद केले आहे. त्याच्या मदतीनेच तुम्ही अमेरिकेत पैसे पाठवू किंवा मागवू शकता. अमेरिकेत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतात सुरु राहणार Google Pay

कंपनीने एका ब्लॉग पोस्टद्वारे माहिती दिली आहे की Google Pay ॲपचा अनुभव सुलभ करण्यासाठी, स्टँडअलोन Google Pay ॲपची अमेरिकन व्हर्जन 4 जून 2024 पासून वापरासाठी उपलब्ध होणार नाही. Google Pay ॲप युनायटेड स्टेट्समध्ये बंद केले जाईल. मात्र Google Pay ॲप भारत आणि सिंगापूर सारख्या इतर बाजारपेठांमध्ये सुरळीतपणे चालू राहील.  (Latest Marathi News)

गुगलने ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, भारत आणि सिंगापूरमध्ये गुगल पे ॲप वापरणाऱ्या लाखो लोकांमध्ये काहीही बदल होणार नाही. गुगल पे बंद झाल्यानंतर अमेरिकेतील युजर्ससाठी येणारा एक बदल म्हणजे युजर्स यापुढे Google Pay ॲपद्वारे इतर व्यक्तींकडून पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाही.

कंपनी Google Pay युजर्सला Google Wallet ॲपवर शिफ्ट होण्याचा सल्ला देत आहे, जे व्हर्च्युअल डेबिट सारखी फीचर्ससह सुसज्ज आहे. यातच युजर्स त्यांच्या अकाउंटमध्ये असलेले पैसे पाहू शकतील आणि बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा Google Pay वेबसाइटद्वारे उपलब्ध असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT