Sundar Pichai - Google Layoff 2024 Saam Tv
बिझनेस

Google Layoffs : गुगलचा पुन्हा कर्मचाऱ्यांना नारळ, भारतातील कामावर होणार परिणाम

Google Lay Off More Employees : गुगलने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कपात केले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार कंपनीने बुधवारी सांगितले की, खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे.

कोमल दामुद्रे

Google Layoffs 2024 :

गुगलने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कपात केले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार कंपनीने बुधवारी सांगितले की, खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे.

कर्मचारी कपातीमुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. कर्मचारी कपातीमुळे काही लोकांना भारत, शिकागो, अटलांटा आणि डब्लिनसह गुंतवणूक (Investment) करत असलेल्या ठिकाणी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा टेक आणि मीडिया कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आले, त्यामुळे यापुढेही कर्मचारी कपात होण्याची भीती आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, गुगलच्या रिअल इस्टेट आणि वित्त विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कर्मचारी गुगल ट्रेझरी, बिझनेस सर्व्हिसेस आणि रेव्हेन्यू कॅश ऑपरेशन्समधील आहेत.

यापूर्वी गुगलने (google) जानेवारी महिन्यातही शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. यामध्ये इंजिनीअरिंग, हार्डवेअर आणि सपोर्ट टीमचा अधिक समावेश होता. कंपनीने AI मध्ये त्यांची गुंतवणूक अधिक प्रमाणात वाढवली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना नोकऱ्या कपातीबाबत चेतावणी दिली होती.

1. मागच्या वर्षी १२ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

गुगलने मागच्या वर्षभरात १२ हजार लोकांना कामावरुन कपात केले होते. यामध्ये हार्डवेअर, जाहिरात विक्री, खरेदी, नकाशे, धोरण, अभियांत्रिकी आणि YouTube सारख्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कशी असणार भारताची प्लेईंग ११; या खेळाडूचा पत्ता होणार कट?

Sunscreen Sun Protection: दररोज सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन D ची कमतरता होते का?

Vastu Tips: घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तुम्हीही चूक करत असाल तर योग्य दिशा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

SCROLL FOR NEXT