Gmail Copy Code meta ai
बिझनेस

Google ने Gmail केलं अपडेट, आणलं भन्नाट फीचर; सर्वांनाच होणार फायदा

Gmail Feature : Gmail च्या नवीन ‘Copy code’ फीचरमुळे ईमेलमधील OTP आणि 2FA कोड थेट कॉपी करता येणार आहे. Android आणि iOS युजर्ससाठी हे फीचर टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.

Sakshi Sunil Jadhav

स्मार्ट फोन युजर्सकडे Gmail आयडी हा असतोच. आता यामध्ये आणखी महत्त्वाचे बदल होणार आहेत. ईमेलच्या माध्यमातून मिळणारा OTP किंवा 2FA (Two-Factor Authentication) कोड कॉपी करणं आता जास्त सोपं होणार आहे. या नव्या फीचरमुळे ईमेल उघडून त्यामधले व्हेरिफिकेशन कोड शोधण्याची आणि तो मॅन्युअली सिलेक्ट करण्याची गरज कमी होणार आहे.

Gmail मध्ये दिसणार ‘Copy code’

नव्या फिचरचं नाव ‘Copy code’ असं आहे. Gmail मध्ये 2FA किंवा व्हेरिफिकेशन रोड असलेला ईमेल आल्यानंतर ईमेलच्या प्रीव्ह्यूमध्ये ‘Copy code’ हा पर्याय दिसू शकतो. हा पर्याय ईमेलच्या सब्जेक्टखाली दिसण्याची शक्यता आहे.

युजरने या बटनावर टॅप केल्यानंतर ईमेलमध्ये आलेला कोड थेट फोनच्या क्लिपबोर्डवर कॉपी होईल. त्यानंतर संबंधित अॅप किंवा वेबसाइटवरील OTP बॉक्समध्ये तो कोड सहजपणे पेस्ट करता येईल.

चुकीचा OTP टाइप होण्याची शक्यता कमी

सध्या ईमेलमधला मोठा किंवा अनेक अंकांचा कोड मॅन्युअली सिलेक्ट करून कॉपी करावा लागतो. विशेषत: मोबाइलवर ही प्रोसेस काही वेळा त्रासदायक ठरू शकते. ‘Copy code’ मुळे वेळ वाचण्यासोबत चुकीचा कोड टाइप होण्याची शक्यताही कमी होऊ शकते.

Android आणि iOS युजर्सना मिळणार सुविधा

आता हे फीचर Gmail च्या Android आणि iOS अॅपवर टप्प्याटप्प्याने रोलआउट केलं जात आहे. त्यामुळे सर्व युजर्सना हा पर्याय लगेच दिसेलच असं नाही. सध्या Gmail च्या टप्प्याटप्प्याने रोलआउट केलं जात आहे. त्यामुळे सर्व युजर्सना हा पर्याय लगेच दिसेलच असं नाही. सध्या Gmail च्या वेब व्हर्जनवर हे फीचर उपलब्ध असल्याची स्पष्ट माहिती नाही.

महत्त्वाचं म्हणजे, हे फीचर फक्त OTP कॉपी करण्याची प्रोसेस सोपी करते. 2FA ची सुरक्षा प्रोसेस यामुळे बंद होत नाही. तसेच ईमेल किंवा फोनवर आलेला OTP कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. कोणी OTP मागितल्यावर तो देणे टाळा, कारण त्याचा गैरवापर मागितल्यावर तो देणं टाळा, कारण त्याचा गैरवापर करून अकाउंटमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

H1N1 eye symptoms: तुम्हालाही फ्लूनंतर डोळ्यांत जळजळ होतेय? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतो मोठा धोका

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुष्काळ भागाची पाहणी करणार

फडणवीस सरकारचे ५ मास्टरस्ट्रोक! शेतकरी, म्हाडा रहिवासी ते कृषी विभागासाठी मोठे निर्णय, वाचा A टू Z माहिती

Coconut Oil for Cooking: महिनाभर नारळाच्या तेलामध्ये अन्नपदार्थ बनवा, शरीरात 5 मोठे बदल झालेले दिसतील

लालबागच्या राजाच्या दरबारात धक्कादायक प्रकार! अभिनेत्रीने दान केलेले पैसे कार्यकर्त्यानेच पळवले; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT