सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असतं. त्यातीलच पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २३ हप्ते आलेले आहेत, तर शेतकरी पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, २,००० रुपयांचा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण ६,००० रुपये मिळतात. ही रक्कम २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेचा २३ वा हप्ता जूनमध्ये जारी करण्यात आला होता. त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये २४ वा हप्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.
२४व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांचे लँड सीडिंग पूर्ण असणे महत्त्वाचे ठरणार आहे. लँड सीडिंग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती पीएम किसानच्या नोंदीशी जोडणे आणि तिचे सत्यापन करणे. त्यामुळे जमीनविषयक माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये योग्यरीत्या नोंदवलेली असणे आवश्यक आहे.
तसेच ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण असणंही महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांना मागचा हप्ता मिळालेला नाही, त्यांनी ही प्रोसेस पूर्ण केल्याने थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
ज्या पात्र शेतकऱ्यांना २३ वा हप्ता मिळाला नाही आणि त्यांनी आता ई-केवायसी तसेच जमीन पडताळणी पूर्ण केली आहे, त्यांना मागच्या हप्त्याची थकीत रक्कम २४व्या हप्त्यासोबत मिळू शकते. अशा परिस्थितीत त्यांच्या खात्यात एकाच वेळी ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
जमिनीच्या नोंदीमध्ये समस्या असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित राज्याच्या भूमि अभिलेख विभागाकडे नोंद दुरुस्त करून घ्यावी. जिल्ह्याच्या महसूल विभागामार्फतही आवश्यक सुधारणा करता येऊ शकतात. तसेच पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवरच्या ‘Know Your Status’या ऑप्शनमधून हप्ता, ई-केवायसी आणि संबंधित स्थिती तपासता येते.
टीप: २४व्या हप्त्याची अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच निश्चित माहिती स्पष्ट होईल. वरील माहिती उपलब्ध माहितीनुसार संभाव्य वेळापत्रकावर आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.