Truecaller Now Works On iPhone india today
बिझनेस

Spam Calls होतील बंद; आता आयफोनमध्ये आलाय Truecallerचा कॉलर आयडीचे फीचर

Truecaller Now Works On iPhone: आता Truecaller ने घोषणा केली आहे की त्याचे Live Caller ID फीचर आता iPhone वर उपलब्ध आहे. आयफोन वापरकर्ते देखील रिअल-टाइम कॉलर आयडी आणि स्पॅम ब्लॉकिंग फीचरचा लाभ घेऊ शकतील.

Bharat Jadhav

Truecaller Now Works On iPhone: iPhone वापरणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Truecaller आयफोनमध्ये नवीन एक फीचर प्रदान करत आहे, ज्यामुळे आयफोन वापरण्याचा अनुभव अजून हायक्लास वाटेल. Truecaller हे अँड्रॉइड वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय ॲप आहे. पण iOS वर ॲपचा फारसा उपयोग होत नाही. याचे कारण म्हणजे Truecaller द्वारे प्रदान केलेले लाइव्ह कॉलर आयडी हे सर्वात महत्वाचे फीचर आहे.

iPhone वरही ते आतापर्यंत उपलब्ध नव्हतं. कॉल आल्यानंतर तुम्ही ॲपमध्ये नंबर शोधू शकता, परंतु रिअल-टाइममध्ये कोण कॉल करत आहे हे समजत नव्हतं. आता Truecaller ने आज घोषणा केली आहे की त्याचे लाइव्ह कॉलर आयडी फीचर आता iPhone वर उपलब्ध आहे.

आयफोन वापरकर्त्यांना Truecaller कडून मिळतील हे फायदे

नवीन फीचर रोलआउटसह, आयफोन वापरकर्ते रिअल-टाइम कॉलर आयडी आणि स्पॅम ब्लॉकिंग फीचरचा लाभ घेण्यास सक्षम असतील. हे फीचर ऑटोमॅटिकली स्पॅम कॉलला ब्लॉक करेल. iOS वर TrueCaller आता वापरकर्त्यांना पूर्वी ओळखले जाणारे कॉल शोधण्याची परवानगी देईल.

IOS वरील कोणताही कॉल Truecaller कडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ओळखला जाईल. आयफोनवरील Truecaller मध्ये आता प्रीमियम फॅमिली प्लॅनचे सदस्यत्व घेता येणार आहे. फॉमिली प्लानसह, अत्यंत कमी मासिक किंवा वार्षिक शुल्कामध्ये चार लोकांपर्यंत Truecaller प्रीमियमचे सर्व फायदे शेअर करता येतील.

Truecaller iOS ॲपवर कॉलर आयडी कसा सुरू करायचा?

Truecaller iOS ॲपवर कॉलर आयडी फीचर सुरू करण्यासाठी तुमचा iPhone iOS 18.2नंतरच व्हर्जन आहे का ते पाहावे लागेल. त्यानंतर, आयफोन सेटिंग्ज उघडा ॲप्स वर जा. आता फोनवरील कॉल ब्लॉकिंग आणि आयडेंटिफिकेशन वर जा. येथे तुम्हाला सर्व Truecaller स्विचेस सक्षम करावे लागतील आणि Truecaller ॲप पुन्हा सुरू करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT