दिवाळी संपल्यानंतर सोन्याच्या दरात काहीशी घट झाल्याचं दिसून येतंय. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावामध्ये घट झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी कमी झाला आहे. बुधवारी म्हणजेच आद 6 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 80,200 रुपये इतका आहे. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचा दर 73,500 रुपयांवर कायम आहे. याशिवाय चांदी 96,900 रुपये आहे.
दिवाळीच्या काळात सोन्याचे दर वधारले होते. तर आता सोन्याच्या दरात आजकाल चढ-उतार होतोय. हा परिणाम जागतिक बाजारातील चढउतारांमुळे होताना दिसतोय. अमेरिकन निवडणुका आणि यूएस फेडरल रिझर्व्हचे निर्णयही यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सध्या किंचित वाढून $2,752.80 प्रति औंस झाला आहे.
24 कॅरेट: ₹80,230 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹73,540 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट: ₹80,280 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹73,590 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट: ₹80,380 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹73,690 प्रति 10 ग्रॅम
मंगळवारच्या दिवशी दिल्लीच्या सोन्याच्या बाजारात सोन्याचा भाव २०० रुपयांनी वाढून तो ८१,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, सोमवारी सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरून 81,100 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला होता. मंगळवारी चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. सोमवारी तो 1,800 रुपयांनी वाढून 96,700 रुपये किलो झाली होती. चांदीचा भाव सोमवारी 94,900 रुपये किलो झालाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.