Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आला की नाही?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारीचे १५०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहि‍णींना आनंद झाला आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, २१०० रुपये देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते.मात्र, हे २१०० रुपये कधीपासून देणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता जमा झाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. परंतु अद्याप काही महिलांना पैसे देण्यात आलेले नाहीत.

लाडकी बहीण योजनेत २६ जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जाणार आहे. हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही महिलांचे पैसे उद्यापर्यंत येतील, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना काळजी करण्याची गरज नाही. त्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. १४ जानेवारी म्हणजेच मकरसंक्रांतीला महिलांना पैसे दिले जातील, असं सांगण्यात आले होते. मात्र, जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरीही पैसे न आल्याने महिला निराश झाल्या होत्या.परंतु आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? असं करा चेक

लाडकी बहीण योजनेत हप्ता आल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आले की नाही के समजणार आहे. त्याचसोबत बँकेच्या मोबाईल अॅपवर जाऊन तुम्ही पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन अकाउंट डिटेल्समध्ये जाऊन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagar palika election result LIVE : नाशिकमध्ये मोठा उलटफेर, अजित पवारांनी २५ वर्षांची सत्ता उलथवली, शिंदेंना जोरदार धक्का

BP हाय होण्याचं कारण काय? तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् चुकीच्या सवयींमुळे होणार परिणाम

Maharashtra Nagar Palika Election Result Live : लातूरच्या उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी

Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...

मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा, नेमके काय घडले? VIDEO

SCROLL FOR NEXT