Central Employee's Salary Will Be Increased As Cabinet Approves Four Percent DA (Dearness Allowance) Saam TV
बिझनेस

DA Hike Increased: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ, इतका वाढणार पगार

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे.

Satish Kengar

7th Pay Commission News:

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल. कर्मचाऱ्यांच्या पुढील पगार ही वाढ जमा केली जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर १२,८६८.७२ रुपयांचा बोजा वाढणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एचआरए (HRA) ही वाढणार

७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, या वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या टेक-होम पगाराच्या पॅकेजमध्ये वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. X, Y आणि Z अशा या तीन श्रेणी आहे. (Latest Marathi News)

जर X श्रेणीचा कर्मचारी शहरे/नगरांमध्ये राहत असेल, तर त्याचा एचआरए ३० टक्क्यांपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे Y श्रेणीसाठी एचआरए २० टक्के आणि Z श्रेणीसाठी १० टक्के असेल. सध्या शहरे/नगरे X, Y आणि Z मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे २७, १८ आणि ९ टक्के एचआरए मिळतो.

ग्रॅच्युइटीची मर्यादाही वाढवली

मंत्रिमंडळ बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, या निर्णयामुळे सरकारवर १२,८६९ कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. पीयूष गोयल म्हणाले की, या निर्णयामुळे एचआरएही वाढणार आहे. याशिवाय ग्रॅच्युइटीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाखांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे. पीयूष गोयल म्हणाले, या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये अनेक मोठे फायदे मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युगेंद्र पवार यांचा 30 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा

मुंबईतील नामांकित शाळेत भयंकर घडलं; ३ विद्यार्थिनींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे अश्लील वर्तन, नेमकं घडलं काय?

Heart Failure: हार्ट फेल्युअरपूर्वी शरीर देत असतं हे संकेत; सामान्य समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात

Accident: सौदी अरेबियामध्ये भीषण अपघात! भाविकांच्या बसला डिझेल टँकरची धडक, मक्काला गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू

Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोन्याला उतरती कळा; आठवड्याच्या पहिल्या दिवशी २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा

SCROLL FOR NEXT