Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळे ८२,३०० रुपयांनी स्वस्त; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. १० तोळा सोनं ८२,३०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आजचे २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती? घ्या जाणून....

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात आज आतापर्यंतची मोठी घसरण

  • २४, २२ आणि १ कॅ८रेट सोनं झालं स्वस्त

  • चांदीच्या दरातही मोठी घट झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा

  • दागिने आणि गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १० तोळा सोन्याचे दर तब्बल ८२,३०० रुपयांनी स्वस्त झाले. तर १ ग्रॅम चांदीचे दर ५ रुपयांनी कमी झाले आहेत. आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जर तुम्ही जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत हे पाहून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८,२३० रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,७०,६२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ८२,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १७,०६,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,५५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,६५,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ७५,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,५४,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटचे तयार केले जातात. त्यामुळे हे सोनं खरेदीकडे ग्राहकांचा कल जास्त असतो. आज जर तुम्ही २२ कॅरेटचे सोनं खरेदी करणार असाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ६,१७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२७,९७० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६१,७०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,७९,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३९५ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल १५,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,९५,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

SCROLL FOR NEXT