Gold Price Today: आजही सोनं महागलं, १.६० लाखांच्या पार पोहोचलं; वाचा 22k, 22k गोल्डची किंमत

Gold Rate India: लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव १.६ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.
Gold Price Today
Gold Price Todayx
Published On

सध्या सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ऐन लग्नसराईमुळे राज्यात सोन्याची मागणी वाढली असताना सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठत आहेत. आज सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीत आज २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच १.६ लाख रुपयांवर पोहोचली आहे. आजच्या सराफा बाजारात ही वाढ दिसून आली आहे.

goodreturns संकेतस्थळानुसार, २ दिवसांनंतर २ टक्क्यांनी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज भारतात सोन्याचा भाव २४ कॅरेट प्रति ग्रॅम १६,५१७ रुपये इतका आहे. जो कालच्या किमतीपेक्षा ३२२ रुपये जास्त आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १५,१४० रुपये आहे. जो कालच्या किमतीपेक्षा २९५ रुपये जास्त आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १२,३८८ रुपये आहे. जो कालच्या किमतीपेक्षा २४२ रुपये जास्त आहे.

Gold Price Today
Chanakya Niti: चाणक्यांचा सल्ला! शांत राहणाऱ्या लोकांपासून वेळीच व्हा सावध; नाहीतर...

२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,६५,१७० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,५१,४०० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १२,३८८ रुपये इतका आहे.

चैन्नईतील आजचा दर

२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १६,७३४ रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,३३० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,७८५ रुपये इतका आहे.

दिल्लीतील आजचा दर

२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १६,५३० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,१५५ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,४०३ रुपये इतका आहे.

कोलकातातील आजचा दर

२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १६,५१७ रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,१४० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,३८८ रुपये इतका आहे.

चांदीचा आजचा दर

आज भारतात चांदीची किंमत ३८० रुपये प्रति ग्रॅम आहे. जी कालच्या किमतीपेक्षा फक्त दहा रुपयांनी महागली आहे. तर चांदीचा दर प्रति किलोग्रॅम ३८०,००० रुपये आहे. ही किंमत कालच्या किमती पेक्षा १० हजारांनी वाढली आहे.

Gold Price Today
Ajit Pawar Death: अजित पवारांचा जन्म कुठे झाला? जाणून घ्या त्यांचे सुरुवातीचे जीवन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com