Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी देवळाली प्रवरा, अहमदनगर जिल्ह्यात झाला. हेच त्यांचे आजोळ असून या गावाशी त्यांचं सगळ्यात घट्ट नात होतं.
अजित पवारांचे १० वीपर्यंतचे शिक्षण देवळाली प्रवरा या आजोळातच झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत गेले आणि बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केलं.
देवळाली प्रवरा गावात अजित पवारांचा जन्म झाला होता. तर तीन महिन्यांपूर्वी त्यांनी आजोळात भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी सर्व मामांच्या घरी भेटी दिल्या होत्या.
अजित पवार आजोळात आल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. स्थानिकांशी संवाद साधत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.
अजित पवार सहकारी क्षेत्रातून राजकारणात आले. १९८२ साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड होऊन त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
१९९१ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. ते सलग १६ वर्षे या पदावर कार्यरत राहिले.
अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. ते राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते असून, सध्या ते पाचव्यांदा या पदावर होते.
सहकार, प्रशासन आणि राजकारणातील प्रदीर्घ अनुभवामुळे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि महत्त्वाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.