DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

Government Employees : १ ऑक्टोबरपासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव DA-DR मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पुढच्या DA वाढीबाबतही आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिना सरकारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई राहत (DR)वाढीबाबत सरकारकडून याच महिन्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.दरम्यान, पश्चिम बंगालमधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA वाढीचा निर्णय १ ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम बंगाल सरकारने जून महिन्यात राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA आणि DR मध्ये २० टक्के वाढ जाहीर केली होती. या निर्णयानंतर १ ऑक्टोबरपासून DA आणि DR हा सुधारित मूळ सॅलरी किंवा पेन्शनच्या ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. या वाढीचा लाभ राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सरकारी उपक्रम, पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार, कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारित बेसिक पगाराच्या ३८ टक्के दराने DA दिला जाईल. तर पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना सुधारित पेन्शनवर ३८ टक्के DR मिळेल. पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी DA १ ऑक्टोबरपासून १७१ टक्क्यांवरून २२३ टक्के करण्यात येणार आहे.

तसेच काही दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या रोजच्या मजुरीमध्ये ११० रुपयांची वाढही १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही पुढील DA वाढीची प्रतीक्षा आहे. उपलब्ध अंदाजानुसार DA मध्ये ३ टक्के वाढ झाल्यावर तो ६३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धुळ्यात विरोधकांचा मोर्चा

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

Garba Hairstyles: गरबा दांडियासाठी ट्राय करा 7 ट्रेंडी हेअरस्टाईल, ट्रेडिशनल लूकला येईल मॉडर्न टच

CNG car mileage: 1 किलो CNG मध्ये कार किती किलोमीटर्स धावते?

SCROLL FOR NEXT