एनएसईने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) सुरू केले.
आता शेअर्सप्रमाणे सोने खरेदी-विक्री करता येणार.
डिजिटल गोल्ड गुंतवणुकीला नवा पर्याय उपलब्ध.
आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी गुंतवणूकदारांना विश्वसनीय मोबदला देणारी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. गुंतवणूक करायची असेल तर अनेकजण सोने खरेदी करण्याचा सल्ला देतात. गुंतवणुकीच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक म्हणून प्रकार सोने खरेदी आहे. चलनवाढ आणि करन्सी चढउतारांपासून संरक्षण करण्यासाठी सोने लोकप्रिय पर्याय ठरत आहे. परंतु चढत्या दरामुळे प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य नाहीये. पण ही अशक्य असणार गोष्ट शक्य होणार आहे.
हो, तुम्ही आता NSE वर शेअर्सप्रमाणे सोने खरेदी करून गुंतवणूक करू शकणार आहात. आहो खरंच तुम्ही जे वाचत आहात ते खरंय, एनएसईने आज म्हणजेच 18 मे रोजी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (ईजीआर) सुरू केले, ज्यामुळे आता शेअर्सप्रमाणेच सोन्याची खरेदी-विक्री डिजिटल पद्धतीने करता येणार आहे. याला सेबी-मान्यताप्राप्त तिजोऱ्यांमध्ये ठेवलेल्या प्रत्यक्ष सोन्याचा आधार देण्यात आला असून T+1 सेटलमेंटद्वारे शुद्धता आणि सुरक्षिततेची खात्री दिली जाते.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (NSE EGR Launch) सुरू केली आहे. तुम्ही शेअर्सप्रमाणेच सहजपणे डिजिटल पद्धतीने सोन्याची खरेदी-विक्री करू शकता. हे डिजिटल सोने पूर्णपणे सुरक्षित आहे. यालासेबीने मान्यता दिली असून त्याला सुरक्षित तिजोऱ्यांमध्ये ठेवलेल्या खऱ्या भौतिक सोन्याचा आधार देण्यात आला आहे.
EGR साठी व्यापाराची वेळ सोमवार ते शुक्रवारी सकाळी 9:00 ते रात्री 11:30 पर्यंत असेल. यूएस डेलाइट सेव्हिंग्ज दरम्यान ही वेळ रात्री 11:55 पर्यंत वाढवली जाईल. सेटलमेंट T+1 (T+1 Gold Settlement) सायकलनुसार केले जाणार आहे, म्हणजेच आज खरेदी केलेल्या सोन्याची मालकी दुसऱ्या दिवशी तुमच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केली जाईल.
गोल्ड ईजीआर म्हणजे काय? (What does Gold EGR mean?)
ईजीआर (EGR) म्हणजे प्रत्यक्ष सोन्याचा डिजिटल पुरावा किंवा प्रमाणपत्र असते. तुम्ही खरेदी केलेले कोणतेही डिजिटल सोने तुमच्या डिमॅट खात्यात दिसेल. त्याचे व्यवस्थापन पूर्ण परवानाधारक तिजोरी पुरवठादारांद्वारे केले जाईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्ही 100 मिलिग्रॅम, 1 ग्रॅम, 10 ग्रॅम, 100 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम इतक्या कमी मूल्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नसते.
सोने केवळ एक गुंतवणूक नसून परंपरा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. खरे सोने खरेदी करताना शुद्धतेची चिंता, चोरीची भीती असते. शिवाय दागिने घडवायचे असतील तर त्याचा खर्च असतो याशिवाय लॉकरच्या व्यवस्थेचा त्रास असतो तो वेगळाच. पण EGR या सर्व समस्या एका क्षणात दूर करते. ते संपूर्ण शुद्धतेची हमी देते.
दरम्यान ईजीआर (EGR) इतर डिजिटल सोन्याच्या पर्यायांपेक्षा वेगळा आणि चांगला आहे, कारण गरज पडल्यास तुम्ही तो कधीही खऱ्या भौतिक सोन्यामध्ये रिडीम (Redeem) करू शकता, असं वित्त तज्ञ सीए लावण्या मोहन यांनी सांगितले आहे.
याला काही आव्हानांचाही सामना करावा लागतो. सध्या बाजारात लिक्विडिटी ही एक मोठी चिंतेची बाब आहे. सर्वच ब्रोकरेज प्लॅटफॉर्म्सनी ते त्यांच्या प्रणालींमध्ये पूर्णपणे सामील केले नाहीये. ज्यामुळे गुंतवणूकदारांची उपलब्धता मर्यादित होते. याव्यतिरिक्त, भारतीयांना अजूनही सोने हाताळण्याची आणि जवळ बाळगण्याची जुनी सवय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.