Gold Silver Rate (31 July 2024) Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate (31 July 2024) : खुशखबर! 65 हजार रुपयांहून स्वस्त झालं प्रति तोळा सोनं; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold Silver Fall Today : सोन्याच्या किंमती पडत असल्याने आज सोनं थेट ६५ हजार रुपयांहून कमी झालं आहे. त्यासह चांदीच्या किंमती सुद्धा खाली घसरत आहेत.

Ruchika Jadhav

सामान्य नागरिकांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज सोन्याचा भाव पुन्हा एकदा खाली घसरला आहे. सोन्याच्या किंमती पडत असल्याने आज सोनं थेट ६५ हजार रुपयांहून कमी झालं आहे. त्यासह चांदीच्या किंमती सुद्धा खाली घसरत आहेत. त्यामुळे आजचा चांदीचा भाव आणि प्रति तोळा सोन्याचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव खाली घसरला आहे. त्यामुळे २२ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ६३,३४० रुपये प्रति तोळा आहे. तर १०० ग्राम सोन्याचा भाव ६,३३,४०० रुपये. १० ग्राम सोन्याचा भाव आज ६३,३४० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५०,६७२ रुपये. तर एक ग्राम सोन्याचा भाव ६,३३४ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती आज देखील खाली घसरल्यात. आज एक तोळा सोन्याचा भाव ६९,०९० रुपये आहे. तर १०० ग्राम सोन्याचा भाव ६,९०,९०० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५५,२७२ रुपये आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,९०९ रुपये असा आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१८ कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज ५१,८२० रुपये आहे. १०० ग्राम सोन्याचा भाव ५,१८,२०० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४१,४५६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याची किंमत आज ५,१८२ रुपये आहे.

विविध शहरांतील आजच्या किंमती

मुंबईत

२२ कॅरेट - ६,३१९ रुपये

२४ कॅरेट - ६,८९४ रुपये

पुण्यात

२२ कॅरेट - ६,३१९ रुपये

२४ कॅरेट - ६,८९४ रुपये

अहमदाबादमध्ये

२२ कॅरेट - ६,३२४ रुपये

२४ कॅरेट - ६,८९९ रुपये

पटनामध्ये

२२ कॅरेट - ६,३२४ रुपये

२४ कॅरेट - ६,८९९ रुपये

कोलकत्तामध्ये

२२ कॅरेट - ६,३१९ रुपये

२४ कॅरेट - ६,८९४ रुपये

चांदीचा घसरलेला भाव

आज चांदीच्या किंमतीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे थेट ८४,४०० रुपयांवर आली आहे. चांदीचे दागिने काळे पडतात. त्यामुळे जास्त व्यक्ती याचे दागिने बनवत नाहीत. मात्र देवांच्या मूर्ती आपण यापासून बनवू शकतो.

मुंबई - ८४,४०० रुपये किलो.

पुणे - ८४,४०० रुपये किलो.

औरंगाबाद - ८४,४०० रुपये किलो.

नवी दिल्ली - ८४,४०० रुपये किलो.

पटना - ८४,४०० रुपये किलो.

अहमदाबाद - ८४,४०० रुपये किलो.

मेरठ - ८४,४०० रुपये किलो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT