Gold Silver Price Saam TV
बिझनेस

Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात हजारो रुपयांची घसरण; खरेदीसाठी दागिन्यांच्या दुकानात मोठी गर्दी

Gold Silver Rate 8th June 2024: १०० ग्राम सोन्याची किंमत ७,१८,२०० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ५७,४५६ रुपये. तर १ ग्राम सोनं ७,१८२ रुपयांना विकलं जात आहे.

Ruchika Jadhav

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोन्यासह चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या २ ते ३ दिवसांत किंमती हजारोंनी घसरल्या आहेत. सोने आणि चांदीच्या किंमतीत २ हजार रुपयांपेक्षाही जास्त घसरण झाली आहे. चला तर मग आजचे नवे दर काय आहेत ते जाणून घेऊ.

२२ कॅरेटच्या किंमती

सोन्याच्या दरात घसरण झाल्याने २२ कॅरेट प्रति तोळा सोनं १,९०० रुपयांनी कमी झालं आहे. त्यामुळे आज ६५,८५० रुपये प्रति तोळा सोन्याचा भाव आहे. तर १०० ग्राम सोन्याची किंमत ६,५८,५०० रुपये इतकी आहे. यासह ८ ग्राम सोन्याची किंमत ५२,६८० रुपये इतकी आहे. तसेच १ ग्राम सोन्याची किंमत ६,५८५ रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

२४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा २,०८० रुपयांनी कमी झालेत. त्यामुळे आज एक तोळा सोन्याचा भाव ७१,८२० रुपये इतका आहे. तर १०० ग्राम सोन्याची किंमत ७,१८,२०० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ५७,४५६ रुपये. तर १ ग्राम सोनं ७,१८२ रुपयांना विकलं जात आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याच्या किंमती

मुंबई आणि पुण्यात २२ कॅरेट सोनं ६,५७० रुपये, २४ कॅरेट सोनं ७,१६७ रुपये आणि १८ कॅरेट सोनं ५,३७६ रुपये इतकी आहे. पुण्यातील किंमतीही अशाच आहेत.

चांदीच्या किंमती

चांदीचे दरही आज घसरले आहेत. आज प्रति किलो चांदी ४,५०० रुपयांनी घसरली आहे. काल ९६,००० रुपयांनी विकली जाणारी चांदी आज थेट ९१,५०० रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये चांदीची किंमत ९१,५०० रुपये इतकीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT