सोने-चांदीच्या किंमती आज पुन्हा एकदा घसरल्या आहेत. आजच्या किंमतीत सोन्याच्या दरांमध्ये २०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. ही किंमत सातत्याने घसरत असल्याने सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक जणांनी दागिने खरेदी करत सोने-चांदीमधील गुंतवणूक आणखी वाढवली आहे.
आजच्या २२ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज २२ कॅरेट सोन्याचा भाव घसरला असून १०० ग्राम सोन्याचा भाव ६,३६,४०० रुपये आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ६३,६४० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ५०,९१२ रुपये आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,३६४ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ६,९४,१०० रुपये इतका आहे. १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ६९,४१० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५५,५२८ रुपये आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,९४१ रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज सकाळी आलेल्या दरांनुसार, १०० ग्राम सोन्याचा भाव ५,२०,७०० रुपये भाव आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ५२,०७० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ४१,६५६ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ५,२०७ रुपये इतका आहे.
पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांतील किंमती
मुंबईमध्ये आज २२ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,३४९ रुपये आहे. तर २४ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,९२६ रुपये इतका आहे.
पुण्यात आज २२ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,३४९ रुपये आणि २४ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,९२६ रुपये आहे.
जळगावमध्ये २२ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,३४९ रुपये आणि २४ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,९२६ रुपये आहे.
नाशिकमध्ये २२ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,३५२ रुपये आणि २४ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,९२६ रुपये आहे.
नागपूरमध्ये २२ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,३४९ रुपये आणि २४ कॅरेट एक ग्राम सोन्याचा भाव ६,९२६ रुपये इतकी किंमत आहे.
चांदीचा भाव काय?
चांदीच्या आलेल्या किंमतीनुसार, आज १ किलो ग्राम चांदीचा भाव ८१,९०० रुपये इतका आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर या विविध शहरांसह अन्य ठिकाणी देखील इतकाच भाव आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.