Gold Silver Price Down Today : सोने ७०० रुपयांनी तर चांदी २,५०० रुपयांनी घसरली; वाचा आजचे महाराष्ट्रातील नवे दर

Gold Silver Price Down (7 August 2024) : चांदीच्या भावात एकाच दिवसात २ हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ८० हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. तर सोन्याच्या भावातही ७०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
Gold Silver Price Down (7 August 2024)
Gold Silver Price Down TodaySaam TV
Published On

सोमवारी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरल्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी सुवर्ण बाजारातही पडझड झाली. चांदीच्या भावात एकाच दिवसात २ हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ८० हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. तर सोन्याच्या भावातही ७०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील राजकीय घडामोडी, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल आणि डॉलरचे घसरत जाणारे दर यामुळे जगभरात चिंता वाढत आहे.

Gold Silver Price Down (7 August 2024)
Gold Silver Rate (31 July 2024) : खुशखबर! 65 हजार रुपयांहून स्वस्त झालं प्रति तोळा सोनं; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

दोन दिवसांपूर्वी जागतिक पातळीवर शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर एमसीएक्सवर सोने- चांदीचे भाव गडगडले होते. मात्र, प्रत्यक्ष सुवर्ण बाजारामध्ये सोने भाव केवळ १०० रुपयांनी, तर चांदीचे भाव २०० रुपयांनी कमी झाली होती. त्यामुळे सोने ७० हजार ७००, तर चांदी ८३ हजार ३०० रुपयांवर आली होती. त्यानंतर मात्र बुधवारी सोन्याचा भाव ६९,८५० रुपये प्रति तोळ्यावर आला.

२२ कॅरेटचा भाव

१ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव आज ६,४०४ रुपये आहे.

८ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव आज ५१,२३२ रुपये आहे.

१० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव आज ६४,०४० रुपये आहे.

१०० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव आज ६,४०,४०० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८५ रुपये आहे.

८ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ५५,८८० रुपये आहे.

१० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,८५० रुपये आहे.

१०० ग्राम ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८,५०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्राम १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,२४० रुपये आहे.

८ ग्राम १८ कॅरेट सोन्याचा भाव ४१,९२० रुपये आहे.

१० ग्राम १८ कॅरेट सोन्याचा भाव ५२,४०० रुपये आहे.

१०० ग्राम १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,२४,००० रुपये आहे.

महाराष्ट्रातील मुख्य शहरांमधील आजचा भाव

मुंबईमध्ये १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३८९ रुपये आहे. १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७० रुपये आहे.

पुण्यात १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३८९ रुपये आहे. १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७० रुपये आहे.

जळगावमध्ये १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३८९ रुपये आहे. १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७५ रुपये आहे.

नागपूरमध्ये १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३८९ रुपये आहे. १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७० रुपये आहे.

नाशिकमध्ये १ ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३९२ रुपये आहे. १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७३ रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीच्या किंमतीत सुद्धा सातत्याने घसरण सुरू आहे. आजही दर जोरदार कोसळले आहेत. त्यानुसार १ किलो सोन्याचा भाव ८० हजार ८०० रुपयांवर आज आहे. आज चांदीच्या भावात किरकोळ रुपयांची घसरण झाली आहे.

विविध शहरांमधील चांदीचा भाव

मुंबईमध्ये एक किलो चांदीचा भाव ८० हजार ८०० रुपये आहे.

पुण्यात एक किलो चांदीचा भाव ८० हजार ८०० रुपये आहे.

जळगावमध्ये एक किलो चांदीचा भाव ८० हजार ८०० रुपये आहे.

नागपूरमध्ये एक किलो चांदीचा भाव ८० हजार ८०० रुपये आहे.

नाशिकमध्ये एक किलो चांदीचा भाव ८० हजार ८०० रुपये आहे.

Gold Silver Price Down (7 August 2024)
Gold Silver Today (3 August 2024) : सोन्याचा भाव पुन्हा ७० हजारांच्या पार, चांदी झाली स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com