Todays Gold-Silver Price Saam Tv News
बिझनेस

Todays Gold-Silver Price : आनंदवार्ता! सुवर्णनगरीत घसरले सोन्याचे दर, १० ग्रॅमसाठी इतके रुपये खर्च करावे लागणार?

Today's Gold Rate : जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी सह सोन्याचे भाव ९७ हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव १ लाखांवर स्थिर झाले आहेत. आज सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे तर चांदी सद्यस्थित स्थिर आहे.

Prashant Patil

जळगाव : जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात एक हजार रुपयाची घसरण झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेअर बाजार घसरल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात तब्बल ४ हजारांची घसरण तर चांदीच्या दरात ६ हजार रुपयांची घसरण झालीय. भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर व अमेरिका चीन यांच्यात झालेल्या व्यापार कराराचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम झाल्याचं दिसत आहे.

जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी सह सोन्याचे भाव ९७ हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव १ लाखांवर स्थिर झाले आहेत. आज सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे तर चांदी सद्यस्थित स्थिर आहे. गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या चांदीच्या दरात अचानक वाढ आणि घट सुरू असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र लग्नसराईमध्ये सोन्याचे दर घसरत असल्याने त्याचा दिलासा ग्राहकांना मिळत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम सोने बाजारावर झाला आहे. सोन्याचा भाव हा १ लाख ९७० पर्यंत गेला होता. मात्र काही दिवसात शेअर बाजार खाली घसरल्याने सोन्याचा भाव देखील एक हजार रुपयाने घसरण झाली आहे. आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह ९७ हजार रुपये प्रति तोळाइतका झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

"ते सेल्फी पूर्णपणे मॉर्फ केलेले..."; व्हायरल फोटोंवर मंत्री गिरीश महाजनांचा सर्वात मोठा आणि थेट खुलासा

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट येण्याच्या १० मिनिटं अगोदर दिसतात ही लक्षणं; वाचा कसा वाचवू शकाल जीव?

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

SCROLL FOR NEXT