Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold -Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे १९,६०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घट झाली आहे. सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. १० तोळे १९,६०० रुपयांनी स्वस्त झाले. तर आजचे १८- २२ अन् २४ कॅरेटचे १ तोळ्याचे दर किती? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • २४ कॅरेटचे १० तोळे सोनं १९,६०० रुपयांनी स्वस्त झाले

  • २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली

  • १ किलो चांदी ४००० रुपयांनी स्वस्त झाली.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,९६० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी घसरण झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते एकदा वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,९६० रुपयांनी कमी झाले आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२५,०८० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १९,६०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,५०,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं शुक्रवारी १२,७०,४०० रुपयांना विकले गेले होते. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांना आज सोनं खरेदीची चांगली संधी आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,८०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१४,६५० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं शुक्रवार १,१६,४५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १८,००० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,४६,५०० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं शुक्रवारी ११,६४,५०० रुपयांना विकले गेले होते.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याचे दरात देखील मोठी घट झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात देखील १,४७० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९३,८१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सोनं शुक्रवारी ९५,२८० रुपये खर्च करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,७०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,३८,१०० रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हेच सोनं ९,५२,८०० रुपयांना खरेदी करावे लागले.

दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीचे दर ४.१० रुपयांनी घसरले. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १६९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ४,१०० रुपयांनी घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,६९,००० रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Farmers In Crisis: केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली|VIDEO

Accident News : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ४० प्रवासी जखमी

Orange Peel : संत्री खाल्ल्यावर सालं फेकून देताय? मग थांबा! घरगुती कामांसाठी करा 'असा' उपाय

आईच्या मैत्रिणीवर जीव जडला, आधी प्रेम नंतर बसमध्ये हत्या; मृतदेहाचे तुकडे करून गटारात फेकले

धनंजय मुंडेंनी जरांगेंचं आव्हान स्वीकारुन नार्को टेस्ट करावी; कुणी केली मागणी? VIDEO

SCROLL FOR NEXT