

सोन्याचे दर घसरले
जळगावच्या सराफा बाजारपेठेतील आजचे सोन्याचे दर
सोन्याचे दर वाढण्यामागची कारणे
सोने चांदीचे दर आज घसरले आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत होती. आता दर कमी होत असल्याने सर्वसामान्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज जळगावच्या सराफा बाजारपेठेतही सोन्याचे दर घसरले आहेत.
जळगावच्या सराफा बाजारपेठेतील सोन्याचे दर (Jalgaon Gold Rate Today)
आज जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे भाव आज २४ कॅरेटचे दर १२५२०० रुपये प्रति तोळा आहेत.२२ कॅरेटचे दर ११४६८३ रुपये प्रति तोळा आहेत. सोन्याच्या दरात ८०० ते १००० रुपयांनी घसरले आहेत. आज चांदीचे दर प्रति किलो १६२००० रुपये झाले आहेत. जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. सणासुदीच्या दिवशी सर्वाधिक सोने विकले जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक सोन्याची विक्री ही जळगावच्या सराफा बाजारपेठेत होते.
सोन्याचे दर भविष्यात वाढण्याची शक्यता (Gold Rate will Hike)
सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. मागील वर्षभरात सोन्याचे दर जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढण्यामागे जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार जबाबदार आहे. याचसोबर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले आहेत. व्याजदरात कपात झाल्याने सोन्याचे दर सोन्यातील गुंतवणूक जास्त प्रमाणात वाढत आहेत. याचसोबत डॉलरचे दर घसरल्यानेदेखील त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचे भाव भविष्यात अजून वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोने ही एक उत्तम गुंतवणूक आहे. यामुळेच सध्या अनेकजण सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.