Gold Rate Prediction: महत्त्वाची बातमी! सोन्याचे दर २५,००० रुपयांनी वाढणार; तज्ज्ञांनी दिली माहिती

Gold Rate Hike by 10-20 Percent Prediction: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सोन्याचे दर पुढील काही महिन्यात १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
Gold Rate Prediction
Gold Rate PredictionSaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा वाढणार

पुढच्या काही महिन्यात सोनं १० ते २० टक्क्यांनी महागणार

सोन्याचे दर वाढण्यामागची कारणे

सोन्याचे दर सध्या १ लाख २० हजारांपेक्षा जास्त आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. सध्या सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होत आहेत. मात्र, हे दर पुढच्या काही महिन्यात १० ते २० टक्के वाढण्याची शक्यता आहे. लक्ष्मी डायमंड्सचे चेअरमॅन चेतन मेहता यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चेतन मेहता यांच्या म्हणण्यांनुसार, जागतिक बाजारपेठेत केंद्रीय बँका आणि गुंतवणूकदारांची सोने खरेदी अशीच सुरु राहण्याची शक्यता आहे. यामुळेच सोन्याचे दर वाढू शकतात. सध्या सोन्याचे दर १,२५,००० रुपयांच्या घरात आहेत. हे २० टक्के म्हणजे २५ हजारांनी वाढू शकतात.

Gold Rate Prediction
Gold Price Today : स्वस्ताईचा सांगावा! सोन्याची किंमत पुन्हा वाढली; २२-२४ कॅरेटचे आजचे दर काय? वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस ४२०० डॉलर्सच्या आसपास आहेत.जागतिक बाजारपेठेत कितीही चढ-उतार झाली तरीही सोन्याच्या दरात फार काही बदल होताना दिसत नाही. याबाबत चेतन मेहता यांनी सांगितले की, सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर सोन्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. पुढे भविष्यात हे दर १० ते २० टक्के वाढण्याची शक्यता आहे.

चेतन मेहता यांनी सांगितले, या वर्षी सोने खरेदी करण्यात वाढ झाली आहे. लग्नाच्या सीझनमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी पुन्हा एकदा वाढू शकते. दिवाळीतदेखील सोने खरेदीत वाढ झाली होती. त्यानंतर १०-१५ दिवस जास्त प्रमाणात सोने खरेदी होताना दिसले नाही. त्यानंतर आता पुन्हा सोने खरेदीत वाढ होताना दिसत आहे.

Gold Rate Prediction
Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

चेतन मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी एक खास ट्रेंड बघायला मिळाला. ग्राहक मोठ्या प्रमाणात सोनं एक्सचेंज करताना दिसत आहे. दिवाळीत जवळपास ४०-५० टक्के ग्राहकांनी जे सोने खरेदी केले ते एक्सचेंज केले होते. दरम्यान, पुढच्या तीन महिन्यात सोने एक्सचेंज २० ते ३० टक्के होण्याची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर भविष्यात वाढू शकतात.

Gold Rate Prediction
Gold Rate Today: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com