Gold Price Today Saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold -Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज खिशाला कात्री लागणार आहे. १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात आज अचानक मोठी वाढ झाली

  • २४ कॅरेट सोनं १,९१० रुपयांनी वाढले

  • तर २२ कॅरेट सोनं १,७५० रुपयांनी महागले

  • १८ कॅरेट सोन्याच्या दरातही १,४३० रुपयांची वाढ झाली

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये सतत घसरण होत होती. त्यामुळे सोनं-चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला होता. पण आज अचानक सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,९१० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दर १,९१० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२७,०४० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १९,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,७०,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१६,४५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १७,५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,६४,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं काल ११,६४,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात देखील १,४३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९५,२८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,५२,८०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे.

दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १६७ रुपये मोजावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ४,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,६७,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT