Today's Gold Silver Rate , (23rd March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात घसरण, चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (23rd March 2024):

सणासुदीच्या काळात धातुंच्या किमतीला अधिक मागणी असते. होळी आणि गुढीपाडव्याचा सण लवकरच येईल. त्यानिमित्त खरेदीदारांची सराफ बाजारात लगबग पाहायला मिळेल.

लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात वाढ झाल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काल सोन्याची नगरी नागपूरमध्ये दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव तीन टक्क्यांनी जीएसटीसह ६९,३०० रुपयांच्या आसपास पोहोचला.

मार्च महिना सुरु झाला आणि उसळी पाहायला मिळाली. परंतु, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भावात चढ-उतार पाहायला मिळाले होते. सराफ बाजारातील व्यापाऱ्यांच्या मतानुसार सोन्याच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमतीमुळे लवकरच ७० हजारांचा टप्पा ओलांडू शकते. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,१४० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,९७० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ११० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६६,८२० रुपये

  • पुणे - ६६,८२० रुपये

  • नागपूर - ६६,८२० रुपये

  • नाशिक - ६६,८५० रुपये

  • ठाणे - ६६,८२० रुपये

  • अमरावती - ६६,८२० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT