Gold Silver Rate (2nd December 2023 ) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (2nd December 2023 ): लग्नसराईत सोनं सर्वसामान्याच्या अवाक्या बाहेर? गाठली उच्चांकाची पातळी, मुंबई-पुण्यात आजचे दर किती?

Today's (2nd December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले. परंतु, दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी असते.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (2nd December 2023 ):

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले. परंतु, दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी असते.

मागच्या सहा महिन्यात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव घसरले असून लग्नसराईच्या काळात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली. सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या दिवसांत सोन्या-चांदीला अधिक मागणी असते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने सहा महिन्यांतील उच्चांकाची पातळी गाठली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या (Gold) भावात उसळी घेतलेली पाहायला मिळाली. काल सोन्याचा भाव ६३,१०० रुपये होता तर आज त्यात ८१० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८६० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,९१० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)वाढ झालेली पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८०,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार १००० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई- ६३,७६० रुपये

  • पुणे - ६३,७६० रुपये

  • नागपूर - ६३,७६० रुपये

  • नाशिक - ६२,७९० रुपये

  • ठाणे - ६३,७६० रुपये

  • अमरावती - ६३,७६० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT