Gold Silver Rate (29th November): Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (29th November): ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका! सोन्याचा भाव ६३ हजार पार, वाचा आजचे दर

Today's (29th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra: सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. अशातच लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (29th November):

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. अशातच लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

सध्याच्या परिस्थितीनुसार लग्नसराईत देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. एचडीएफसीचे सिक्योरिटीजचे कमॉडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता यांनी सांगितले की, शेअर बाजारातील चढउतारामुळे सोन्याचा भाव होऊ शकतो. लवकरच सोन्याचा दर हा ६७ हजारांपर्यंत जाऊ शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. दसऱ्याच्या काळात सोन्याचा भाव हा ६२ हजारांपर्यंत पोहोचला होता. अशातच आज सोन्याने ६३ हजारांचा टप्पा पार केला आहे. सोन्याने उच्चांकाची पातळी ओलांडली आहे. पुढच्या वर्षात सोनं (Gold) अधिक महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८२५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेत २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,५३० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या किमतीत ७५० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,२०० रुपये मोजावे लागतील. चांदीचा भाव ७० रुपयांनी वाढला आहे.(Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई- ६३,३८० रुपये

  • पुणे - ६३,३८० रुपये

  • नागपूर - ६३,३८० रुपये

  • नाशिक - ६३,४१० रुपये

  • ठाणे - ६३,३८० रुपये

  • अमरावती - ६३,३८० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Horoscope Today : काहींना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी मिळतील, तर कोणाला होईल आजाराचे निदान, तुमची रास काय?

SCROLL FOR NEXT