Gold Silver Price Today (2nd November) Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Today (2nd November): सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या किंमतीतही वाढ; चेक करा आजचे लेटेस्ट रेट

Today's (2nd November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज पुन्हा सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (2nd November):

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु आज पुन्हा सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली. सणासुदीच्या काळात सोनं महागल्याने खरेदीदारांची चिंता वाढली आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याला विशेष मागणी असते. परंतु दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली. दिवाळीत सोनं महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागच्या महिन्यात सुरुवातीला सोन्याचा भाव हा ५७ हजारांवर होता. परंतु, त्यानंतर आखाती देशातील युद्धामुळे सोन्याच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. दसऱ्यापूर्वी सोन्याने ६२ हजारांची पातळी ओलांडली. इस्त्राइल- हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली. त्यामुळे सराफ बाजारात खरेदीदारांची वर्दळ कमी पाहायला मिळाली.

आठवड्याभराच्या तुलनेत सोन्याच्या दरात १२०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. अशातच आज सोन्यात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६६५ रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,७९० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीही वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७४,८०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार मुंबई (Mumbai)-पुणे-नागपूर आणि ठाण्यात २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,६४० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,६७० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : भयंकर चक्रीवादळाचं सावट! 110 किमी वेगात हवा तांडव घालणार, IMD चा गंभीर इशारा, भारतावरही संकट?

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Shreyas Iyer : टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार गंभीर जखमी, ३ आठवडे संघाबाहेर

Avocado Sandwich Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी ॲव्होकॅडो सँडविच, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Bigg Boss 19 : "लाइन मत क्रॉस करणा..." सलमान खानने फरहाना भट्टला दिली शेवटची वॉर्निंग, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT