Mumbai Air Pollution
Mumbai Air PollutionSaam Tv

Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो काळजी घ्या! प्रदूषणामुळे मुंबईतील हवा 'विषारी', आरोग्य जपा

Health Issue : प्रदूषणामुळे हृदयविकार, मधुमेह आणि फुफ्फुसांचा आजार बळावण्याची शक्यता आहे.
Published on

Pollution Side Effects :

मान्सूने एक्झिट घेतली आणि महिन्याभरापासून मुंबईच्या वातावरणात बदल होताना दिसून आले. ऑक्टोबर हिटमध्ये काही ठिकाणी धुळीचे वातावरण पाहायला मिळाले. वाढत्या प्रदूषणामुळे हवेतील गुणवत्ता खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण मुंबईतील AQI म्हणजेच हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 301 एवढा खालावला आहे. सफर या संस्थेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ हवेच्या गुणवत्ता दर्शविणारा डॅशबोर्ड बसवण्यात आला असून हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाल्याने नागरिकांना धोक्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य जपायला हवे असे देखील डॉक्टरांनी म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाढते प्रदूषण (Pollution), शहरीकरण आणि ट्राफिकमुळे हवेतील गुणवत्ता घसरत असल्याचे कारण समोर आले आहे. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि फुफ्फुसांचा आजार बळावण्याची शक्यता आहे. प्रदूषणाचा वाढता विळखा पाहाता मुंबईतील हवा ही दिल्लीपेक्षाही अधिक विषारी असल्याचे म्हटले जात आहे. अशावेळी नागरिकांना आरोग्याची (Health) काळजी कशी घ्यायला हवी जाणून घेऊया.

Mumbai Air Pollution
Success Tips : सकाळच्या या ८ चांगल्या सवयींमुळे कठीण मार्ग होतो सोपा, मिळते घवघवीत यश

1. काळजी कशी घ्याल?

  • धुळीमुळे शिंका येणे, सर्दी, खोकला, अॅलर्जी होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो यासाठी मास्कचा वापर करा.

  • खराब हवेमुळे श्वसनमार्गाला सूज येऊ शकते त्यामुळे घशाचा त्रास उद्भवू शकतो. दम्याचा आजार बळावू शकतो.

  • प्रदूषणाच्या जास्त संपर्कात आल्यास हृदयाचे आजार (Heart Disease), उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

  • धुळीचा किंवा प्रदूषणाचा फुफ्फुसांवर परिणाम झाल्यास न्यूमोनिया सारखा आजार होतो. त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com