Gold Silver Price Slips Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Slips : सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Silver Price Falls : दागिन्यांची शॉपिंग असो किंवा गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्कीट घ्यायची असोत. तुम्ही आज स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.

Ruchika Jadhav

लग्नसमारंभात आजकाल अनेक व्यक्ती डायमंड आणि मोत्यांनी बनवलेले दागिने परिधान करतात. मात्र त्यानंतर घरच्या साध्या लूकमध्ये एडीस्टोन असलेली हेवी ज्वेलरी सूट होत नाही. त्यामुळे सोन्याचे दागिने घ्यावेच लागतात. आता तुम्ही देखील लग्नासाठी गुंतवणूक म्हणून सोन्याची बिक्सीटं घेत असाल तर आजचा दिवस खास आहे.

कारण सलग दोन दिवस सोन्यासह चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे दागिन्यांची शॉपिंग असो किंवा गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्कीटं घ्यायची असोत, तुम्ही आज स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.

आजचा भाव

आज सोन्याच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. २२, २४ आणि १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे २२ कॅरेट सोनं ६,७७,४०० रुपये १०० ग्राम आणि २४ कॅरेट सोनं ७,३८,९०० रुपये १०० ग्राम तर १८ कॅरेट सोनं ५,५४,२०० रुपये १०० ग्राम आहे.

प्रति तोळ्याचा आजचा भाव

आज १८ कॅरेट सोनं प्रति तोळा ५५,४२० रुपये आहे. तर २२ कॅरेट ६७,७४० रुपये प्रति तोळा आणि २४ कॅरेट ७३,८९० रुपये प्रति तोळ्याने सोन्याची विक्री होत आहे.

मुंबई आणि पुण्यातील दर माहितीयेत का?

मुंबईत सोन्याचा भाव घसरला आहे. मुंबईत २२ कॅरेट सोनं ६,७५९ तर २४ कॅरेट ७,३७४ प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५,५३० रुपये ग्रामने विकलं जात आहे. मुंबई आणि पुण्याचे दर कमी झाले तरी सारखेच असतात. त्यामुळे पुण्यातील भाव देखील वर दिलेल्या मुंबईच्या दरांप्रमाणेच आहे.

चांदीच्या किंमती

सोन्यासह चांदीच्या प्रति किलो किंमतीमध्ये १०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज एक किलो चांदीची किंमत ८९,००० रुपये आहे. मुंबईत आणि पुण्यात चांदीचा भाव देखील ८९,००० रुपये किलो आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT