राज्यात सध्या सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. गणपती बाप्पा घरी येणार म्हणून प्रत्येक व्यक्ती कामाला लागला आहे. गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच अनेक व्यक्ती सोने किंवा चांदीच्या मूर्ती देखील खरेदी करतात. अशात गणेशोत्सव सुरू होण्याआधीच सोने-चांदीचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे आजच्या विविध शहरांतील किंमती काय ते जाणून घेऊ.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,६८,४०० रुपये आहे. तर एक तोळा सोन्याचा भाव ६६,८४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५३,४७२ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६,६८४ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,२९,१०० रुपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याचा भाव ७२,९१० रुपये इतका आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५८,३२८ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याची किंमत आज ७,२९१ रुपये इतकी आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत किती?
आज १८ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ५,४६,९०० रुपयांना विकलं जात आहे. १० ग्रॅम सोनं ५४,६९० रुपयांवर आहे. ८ ग्रॅम सोनं ४३,७५२ रुपये आणि १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,४६९ रुपये इतका आहे.
मुंबई-पुण्यासह अन्य शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती
मुंबईमध्ये
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६६९
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२७६
पुण्यामध्ये
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६६९
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२७६
जळगावात
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६६९
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२७६
नागपूरमध्ये
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६६९
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२७६
नाशकात
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६६९
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२७६
अमरावतीमध्ये
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६६९
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२७६
आजचा चांदीचा भाव काय?
आज चांदीच्या किंमती सुद्धा कमी झाल्या आहेत. चांदी १०० रुपयांनी स्वस्त झालीये. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव ८५,९०० रुपये इतक आहे. तर मुंबईमध्ये ८५,९०० रुपये किलो, पुण्यात ८५,९०० रुपये किलो, नागपूरमध्ये ८५,९०० रुपये किलो इतका भाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.