Gold Silver Price: आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदीचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव घसरले की वाढले? जाणून घ्या...

Gold Silver Price Today 17th August 2024: आज सोने- चांदीचे नवे दर जाहीर झाले आहे. तुमच्या शहरातील सोने-चांदीच्या किंमती जाणून घ्या.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam Tv
Published On

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. सणासुदीच्या कालावधीच सोने- चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. सणासुदीच्या काळातच लोक चांगला मुहूर्त पाहून साखरपुडा किंवा लग्न करतात. या शुभ कार्यासाठी अनेक लोक सोने- चांदी खरेदी करतात. सोने चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत.

गेल्या अनेक दिवसांत सोने- चांदीच्या भावात १०००-१५०० रुपयांनी चढ-उतार होत आहे. आज सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. काल २२ कॅरेट सोने ६५,६५० रुपये प्रति तोळा होते. आज सोन्याची किंमत ६५,६६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोने ७१,६३० रुपये प्रति तोळा आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ५३,७३० रुपये प्रति तोळा आहे.

चांदीची किंमत

चांदीच्या भावातदेखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहे. आज १० ग्रॅम चांदी ८४१ रुपयांवर विकली जात आहे. तर १०० ग्रॅम चांदी ८,४१० रुपयांवर विकली जात आहे. १००० ग्रॅम चांदी ८४,१०० रुपयांवर विकले जात आहे.

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,५६६ रुपये आहे. चेन्नईत १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,५६६ रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,५८१ रुपये आहे. कोलकत्त्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,५६६ रुपये आहे.

Gold Silver Price
Government Schemes For Girls: मुलींसाठी सरकारच्या खास योजना! शिक्षणापासून ते लग्नापर्यंत मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

२४ कॅरेट सोन्याची किंमत

मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१६३ रुपये आहे. दिल्लीत १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१७८ रुपये आहे. कोलकत्त्यात सोन्याची किंमत ७,१६३ रुपये आहे.

Gold Silver Price
Post Office MIS Scheme: फक्त एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला ५००० रुपये कमवा; पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना नक्की आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com