(16th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : खरेदीदारांना झटका! सोन्याचा विक्रमी उच्चांक, चांदीनंही घेतली भरारी, मुंबई-पुण्यातील आजचा भाव किती?

(16th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या नाकीनऊ आले आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या नाकीनऊ आले आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली.

सलग आठ आठवड्यापासून धातुंच्या कमीत तेजी पाहायला मिळाली. गुढीपाडव्याच्या पूर्वी सोन्याच्या दराने ७० हजारांचा आकडा पार केला होता. तर त्यानंतर सोन्याच्या दराने विक्रमी झेप घेतली आहे.

सोने आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे सराफ बाजारातील व्यापारांना टेन्शन आले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटक्यांचा सामना करावा लागला आहे. सोन्यातील चढ-उतार कायम राहिला तर लवकरच ७५ हजारांचा आकडा पार करु शकतो असे मत व्यापारांनी मांडले आहे.

अमेरिकेतील व्याजदर कपातीची अपेक्षा, जागतिक भू-राजकीय परिस्थिती यामुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,८१० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७४,२८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ९८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८७,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७४,१३० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७४,१३० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७४,१३० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७४,१६० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७४,१३० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७४,१३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT