Gold Silver Price Fall  Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Today : दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; सोने घसरले, पण चांदी वधारली!

Ruchika Jadhav

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरात घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या शुक्रवारी २००० रुपयांहून जास्त घसरण झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. आज सोनं स्वस्त झालं असलं तरी चांदी मात्र महागली आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोनं १०० रुपयांनी कमी झालंय. त्यामुळे याचे दर ६,५८,४०० रुपयांवर पोहचलेत. तर १० ग्राम सोन्याचा दर ६५,८४० रुपये इतका आहे. ८ ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ५२,६७२ रुपयांनी विकलं जात आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये देखील बदल झाला आहे. १०० रुपयांनी सोनं स्वस्त होऊन ७,१८,१०० रुपये १०० ग्राम सोन्याची किंमत झाली आहे. तर एक तोळा सोन्याची किंमत ७१,८१० रुपये आहे आणि ८ ग्राम सोनं ५७,४४८ रुपये किंमतीने विकलं जात आहे.

मुंबई पुण्यातील किंमती

मुंबईत २४ कॅरेट सोनं ७,१६६ रुपये एक ग्राम सोन्याची किंमत आहे. तर पुण्यात देखील एक ग्राम सोनं ७,१६६ रुपयांना विकलं जात आहे.

चांदीच्या किंमती

चांदीच्या किंमती आज वाढल्या आहेत. आज १ किलो चांदीची किंमत १०० रुपयांनी वाढलीये. त्यामुळे आजचा भाव ९१,८०० रुपये इतका आहे.

विविध शहरांतील चांदीच्या किंमती

मुंबई - ९१,८०० रुपये किलो

पुणे - ९१,८०० रुपये किलो

नवी दिल्ली - ९१,८०० रुपये किलो

पटना - ९१,८०० रुपये किलो

अहमदाबाद -९१,८०० रुपये किलो

कोलकत्ता - ९१,८०० रुपये किलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT