Gold Prices Drop Sharply After Diwali Saam
बिझनेस

लग्नसराईत सोनं स्वस्त! २४ कॅरेट १० तोळं सोन्याचे भाव ८ हजारांनी घसरले, वाचा आजचा लेटेस्ट दर

Gold Prices Drop Sharply After Diwali: दिवाळीनंतर सोन्याचे भावात घसरण. ग्राहकांना समाधान. चांदीच्या दरात मात्र वाढ.

Bhagyashree Kamble

  • तुळशी विवाहनंतर २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण.

  • २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८०० रूपयांची घट.

  • मात्र, चांदीच्या दरात १०० रूपयांची वाढ.

दिवाळी आणि तुळशी विवाह झाल्यानंतर लगेचच लग्नसराईला सुरूवात होते. लग्न ठरल्यानंतर आपण खरेदी करतो. खरेदीमध्ये कपडे, दागिने आलेच. लग्न म्हटलं की सोन्याचे दागिने आलेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वारंवार चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोन्याच्या भावात कमालीची घट झाली आहे. २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८००० रूपयांची घट झाली आहे.

आज १४ नोव्हेंबर २०२५. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२७,८५० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८००० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,७८,५०० रूपये मोजावे लागतील. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१७,२०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७००० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,७२,००० रूपये मोजावे लागतील.

२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९५,८९० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,८०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,५८,९०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या भावात घट झाली आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचं चित्र आहे. १ ग्रॅम चांदीसाठी आपल्याला १७३ रूपये मोजावे लागतील. १ किलो चांदीच्या दरात १०० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,७३,१०० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडकरांसाठी खूशखबर, बीड - वडवणीदरम्यान लवकरच रेल्वे धावणार; आज होणार इंजिन चाचणी

Maharashtra Live News Update: शरद पवार घेणार बाबा आढाव यांची भेट

VitaminB12 Facts: हाय-पाय सुन्न, मुंग्या येतात? शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता, वेळीच ओळखा

Accident : अयोध्येला जाताना भीषण अपघात! भाविकांच्या बसला ट्रेलरची धडक, एकाचा मृत्यू तर ३० जखमी

Kalyan - Dombivali : कल्याण-डोंबिवलीतील वादावर पडदा पडणार? एकनाथ शिंदे - रवींद्र चव्हाण येणार एकाच मंचावर| VIDEO

SCROLL FOR NEXT