Gold Rate  Saam TV marathi
बिझनेस

Gold Rate : सोन्याचे भाव वधारले की घसरले? काय आहेत 24 कॅरेटचे दर?

Gold Rate update : पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. जाणून घ्या सोन्याचे दर

Vishal Gangurde

युद्धाचा थेट सोन्याच्या दरावर परिणाम

दिल्लीत सोन्याच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोन्याच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. या युद्धाचा परिणाम सोन्यावर होताना दिसत आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,५५,९०० रुपयांवर पोहोचल्याची माहिती अखिल भारतीय सराफ संघाने दिली आहे.

मल्टी कमोडिटी एस्क्चेंजवर (MCX) २४ कॅरेट सोन्याचे भाव ०.०७ टक्क्यांनी वाढून १०० रुपयांनी वाढून प्रति तोळा १५२,७९९ रुपयांवर पोहोचला आहे. काल सोन्याची किंमत प्रति तोळा १५२,६९९ रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस ४,७०८.१७ डॉलरवर पोहोचली आहे.

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,५४,१९० रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या ताजे आकडेवारीनुसार, शक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,५१,४७९ रुपयांवर बंद झाला होता. शनिवार आणि रविवारी बाजार बंद असल्याने दोन्ही दिवशी जुने भाव लागू होणार आहेत.

तुमच्या शहरात सोन्याचा दर काय?

दिल्ली : २४ कॅरेट - १५४,२००

मुंबई : २४ कॅरेट - १५४०५०

पुणे : २४ कॅरेट - १५४,०५०

नागपूर : २४ कॅरेट - १५४०८०

नाशिक : २४ कॅरेट - १५४०८०

कोलकाता : २४ कॅरेट - १५४०५०

चेन्नई : २४ कॅरेट - १५३८१०

दिल्लीत सराफ बाजारात शुक्रवारी तिसऱ्या सत्रात सोन्याचे दर कोसळले. सोन्याच्या किंमतीत २०० रुपयांनी घसरण दिसून आली. अखिल भारतीय सराफ संघाच्या माहितीनुसार, ९९.९ शुद्ध असणाऱ्या सोन्याचे दर २०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १५५९०० रुपयांवर पोहोचला आहे. तर गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळा १५६१०० रुपयांवर बंद झाला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस ४७०८.१७ डॉलरवर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT