Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : भारत बंद असतानाच सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा इतकी किंमत, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Gold rate today India Mumbai Pune : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम १५,८४० रुपयांवर आले असून १० ग्रॅमसाठी १,२०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचेही दर कमी झाले आहेत. जाणून घ्या आजचे ताजे गोल्ड रेट.

Namdeo Kumbhar

Gold rate today 24K 22K 18K price in India Mumbai pune : जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचा डॉलर अधिक मजबूत झालाय. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झालाय. गुरूवारी सराफा बाजार उघडताच भारतामध्ये सोन्याचे दर घसरले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियामध्ये सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १२०० रूपयांनी घसरल्याचे दिसतेय. तर एक ग्रॅम सोनं १२० रूपयांनी स्वस्त झालेय. तर १० तोळं सोनं १२००० रूपयांनी स्वस्त झालेय. सोन्याच्या किंमती घसरत असतानाच अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.

देशातील अनेक कामगार संघटना अन् शेतकरी संघटनेनं आज भारत बंदची हाक दिली आहे. नवीन कामगार कायदा आणि अमेरिका-भारत यांच्यातील प्रस्तावीत ट्रेड डीलच्या विरोधात देशातील अनेकजणांनी या बंदला पाठिंबा दिलाय. देशातील महत्त्वाच्या १० कामगार संघटना या बंदचे नेतृत्व करत आहेत. INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा यात मासवेश आहे. वाहतूक ते बँका अन् शाळा, बाजारपेठावर या बंदचा परिणाम होणार आहे. या बंदला सरकारकडून कोणताही पाठिंबा नाही अथवा तशी अधिकृत घोषणा नाही. आजच्या भारत बंदचा सोन्याच्या दरावर परिणाम होणार का? सोन्याची विक्री घटणार का? याबाबतही सराफा बाजारात चर्चा आहे.

भारतातील सोन्याचा भाव

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,८४० रुपयांवर आला. एक ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १२० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली. २२ कॅरेटचे सोनं प्रति ग्रॅम ११० रूपयांनी स्वस्त होऊन १४,५२० रुपयांवर आलेय. तर १८ कॅरेटचे सोनं ११८८० रूपये प्रति ग्रॅम आहे. बुधवारच्या तुलनेत १८ कॅरेट सोन्याची किंमत ९० रूपयांनी स्वस्त झाली.

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर -

ग्रॅम १५,८४० रुपये - १२० रुपयांनी स्वस्त

१० ग्रॅम १,५८,४०० रुपये -१२०० रुपयांनी स्वस्त

२२ कॅरेट सोन्याचा दर

प्रति ग्रॅम १४,५२० रुपये - ११० रुपये कमी

प्रति १० ग्रॅम १,४५,२०० रुपये - १,१०० रुपयांनी स्वस्त

१८ कॅरेट सोन्याचा दर

प्रति ग्रॅम - ११८९५ रुपये - ९० रुपये कमी

प्रति १० ग्रॅम ११८९५० रुपये - ९०० रुपयांनी स्वस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवनेरी एसटी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार

Government Scheme: लाडकीसाठी फडणवीस सरकारची खास योजना, तब्बल ३०० कोटींची तरतूद; मिळणार आता १० लाखांपर्यंत कर्ज, वाचा

Yoga Exercise For Glowing Skin: सकाळी फक्त १० मिनिटे योगा करा, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Jalna–Jalgaon Railway Project: जालना ते जळगाव धावणार रेल्वे; ५,८०४ कोटींचा निधी मंजूर, १७ नवीन स्थानके असणारा नवा रेल्वे मार्ग कसा असेल?

Housing Society : मोठी बातमी! सोसायट्यांना आता 'NA' टॅक्स भरावा लागणार नाही; थकबाकीही माफ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT