Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२, २४ अन् १८ कॅरेटचे दर

Gold Rate Today Fall: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे ७१० रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. आजचे तुमच्या शहरातील २२ अन् २४ कॅरेट सोन्याचे दर वाचा.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर ७१० रुपयांनी घसरले

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर घसरले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७१० रुपयांनी घसरले आहेत.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. त्याचसोबत अधिकमास सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करतात. दरम्यान, सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. परंतु आज ते थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहेत.आजचे सोन्याचे दर वाचा.

आजचे सोन्याचे दर

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५६,२२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५६८ रुपयांनी घसरले असून हे दर १,२४,९७६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७,१०० रुपयांनी घसरले असून हे दर १५,६२,२०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामगे ६५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४३,२०० रुपये झाले आहेतय ८ ग्रॅममागे सोनं ५२० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १,१४,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी घसरले असून हे दर १४,३२,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५३० रुपयांनी घसरले असून हे दर १,१७,१७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४२४ रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९३,७३६ रुपये झाले आहेत. १- तोळ्यामागे ५,३०० रुपयांनी घसरण झाली असून हे दर ११,७१,७०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT