Gold Price Hike Saam TVNews
बिझनेस

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा लेटेस्ट दर

Gold and silver prices in India: भारतामध्ये सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून २४ कॅरेट सोनं १ लाखाच्या वर गेलं आहे. चांदीही १.१६ लाख प्रति किलो दराने विकली जात आहे.

Bhagyashree Kamble

सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे. अशातच मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देखील हीच स्थिती कायम असून, भारतात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ६६० रुपयांची वाढ झाली असून, आता त्याची किंमत ₹१,००,०४० रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे सोनं पुन्हा एकदा ₹१ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार, हे निश्चित.

शनिवारी सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ₹६०० रुपयांची वाढ झाली असून, त्यासाठी ₹९१,७०० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात ₹४९० रुपयांची वाढ झाली आहे आणि १० ग्रॅमसाठी ₹७५,०३० रुपये मोजावे लागणार आहेत.

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की. दरम्यान, सोन्यासह चांदीच्या दरानेही उच्चांकी गाठली. आज भारतात १ किलो चांदीच्या दरात २,१०० रूपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदीसाठी १,१६,००० रूपये मोजावे लागतील. त्यामुळे चांदीनेही १ लाखांचा टप्पा पार पाडला आहे.

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

भारतात सोन्याची किंमत आतंरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क अन् कर, रूपये आणि डॉलरमधील दर, मागणी आणि पुरवठा याच्यातील समतोल, या व अशा विविध गोष्टीवर आधारीत सोन्याच्या दरात बदल केले जाते. भारतात सोनं फक्त गुंतवणुकीसाठी नसून, सणासुदीच्या काळात आवश्य खरेदी केली जाते. यामुळे सोन्याच्या दरातील बदलाचा थेट परिणाम लोकांवर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT