Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याने उच्चांक गाठला; वाचा २२ आणि २४ कॅरेट्स सोन्याचे आजचे दर

Gold Rate Today 3rd September 2025: गणेशोत्सव सुरु झाल्यापासून सोन्याचे दर सतत वाढत आहेत. आज सोन्याने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर १० तोळ्यामागे ८००० रुपयांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्य दरात गणेशोत्सव सुरु झाल्यापासून वाढ होत आहे. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. सोन्याचे दर मागच्या ५-६ दिवसांपासून सलग वाढत आहेत. आज तर सोन्याने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर १ लाख ६ हजार रुपये झाले आहेत.

सोन्याचे दर सतत वाढत आहेत. सोन्याचे दर एका आठवड्यात ६ हजार रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान, सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोनं खरेदी करतात. याच सणासुदीला अचानक सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना मात्र फटका बसला आहे.

सोन्याचे दर (Gold Rate Hike Today)

आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८८० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्यासाठी तुम्हाला १,०६,९७० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७०४ रुपयांनी वाढले असून ते सध्या ८८,५७६ रुपयांना विकले जात आहे. १० तोळ्याचे दर ८,८०० रुपयांनी वाढले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९८,०५० रुपयांनी वाढले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६४० रुपयांनी वाढले आहेत. या दरात ७८,४४० रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे ८००० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ९,८०,५०० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांनी वाढले असून हे दर ८०,२३० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे ५२८ रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ६४,१८४ रुपये आहेत. १० तोळ्यामागे ६,६०० रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT