नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोनं महागलं
सोन्याच्या दराने उच्चांक गाठला
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.
नवीन वर्षात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. काही वर्षात सोन्याचे दर ३ लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर येत्या काळात तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला फटका बसणार आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या.
सोन्याचे दर
आज २ जानेवारी रोजी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१४० रुपयांनी वाढले आहेत. हे दर आज १,३६,२०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ११,४०० रुपयांनी महागलं असून हे दर १३,६२,००० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याची किंमत ९१२ रुपयांनी वाढली असून १,०८,९६० रुपये झाली आहे.
२२ कॅरेटचे दर
आज २२ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १०५० रुपयांनी वाढले आहे. आज सोनं १ तोळ्यामागे १,२४,८५० रुपयांना विकले जात आहे. १० तोळ्यामागे सोनं १०५०० रुपयांनी महागलं असून हे दर १२,४८,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे भाव
१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८६० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,०२,१५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६८८ रुपयांची वाढ झाली आहे हे दर ८१,७२० रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८६०० रुपयांनी वाढले असून हे दर १०,२१,५०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.