Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गुढीपाडव्याला सकाळीच सोन्याच्या दरात बदल; वाचा आजचे २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today on Gudi Padwa 2026: सोन्याचे दर हे दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. सोन्याचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत ७० हजारांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदार सोनं खरेदीकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

आज गुढीपाडव्याला सोनं खरेदीचा मूहूर्त

सोन्याचे दर १, ५८,१०५ रुपये

मागच्या वर्षीच्या तुलनेत ७० हजारांची वाढ

आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मूहूर्तांपैकी एक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकजण सोनं खरेदी करतात. आज सोनं खरेदी करण्याचा विशेष मूहूर्त असल्याचे म्हटले जाते. या दिवशी सोनं खरेदी करणे शूभ मानले जाते. त्यामुळे दरवर्षी आजच्या दिवशी सोनाराकडे खूप गर्दी असते.आजच्या दिवशी सोन चांदी खरेदी केलं तर शुभ असते, घरात वर्षभर बरकत असते अशी नागरिकांची भावना आहेत.मात्र, यंदा सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त आहेत त्यामुळे तरीही लोक सोनं खरेदी करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today On Gudi Padwa)

आज सकाळीच जळगावातील सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १ लाख ५८ हजार १०५ रुपयांवर पोहचले आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह २ लाख ५७ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे जर तुम्हाला १ तोळा सोनं खरेदी करायचं असेल तर २ लाखांपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोनं ७० हजारांनी महागलं आहे तर चांदीच्या दरात दीड लाखांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

सोन्याच्या दर मागच्या वर्षभरात जवळपास ७० ते ८० हजारांनी वाढले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.सोन्याचे दर कमी व्हावेत, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. मात्र, यंदाच्या गुढीपाडव्या सोन्याचे दर खूप जास्त असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडल्याचे दिसत आहे.

सोन्याचे दर का वाढले? (Why Gold Rate Increase)

सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. जागतिक पातळीवरील युद्ध परिस्थिती, डॉलरच्या किंमतीत वाढ अशा अनेक गोष्टींमुळे सोन्याचे दर वाढत आहेत.वर्षभरात डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातलं धोरण, रशिया युक्रेन युद्ध याबरोबरच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गणेश मंडळांची उद्या महाबैठक

Shiv Thackeray: टीव्हीनंतर आता मोठ्या पडद्यावर शिव ठाकरेची एंट्री; 'रक्तनीती'मधून करणार मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री

Test Ranking : कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; खराब कामगिरीचा भारताच्या फलंदाजाला फटका, टॉप १० मध्ये कोण?

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT