Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं महागलं; १० तोळ्यामागे ३८०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Gold Rate Today on Ganesh Chaturthi: आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

आज गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीला सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. गणेश चतुर्थी हा चांगला मूहूर्त आहे. या दिवशी अनेकजण नवनवीन वस्तू खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. आपल्या लाडक्या बाप्पाासाठी अनेकजण सोन्याचे लहान दागिने खरेदी करतात.

काही दिवसांत गौराईचं आगमन होणार आहे. गौरीसाठीही सोने खरेदी केले जाते. परंतु सध्या सोन्याचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. आजदेखील सोन्याचे दर वाढले आहे. प्रति तोळ्यामागे नागरिकांना १ लाख २ हजार रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी वाढले आहेत.

सोन्याचे दर वाढले (Gold Rate)

आज २४ कॅरेट (24k Gold Rate) सोन्याचे दर ३८० रुपयांनी वाढले आहेत.हे दर १,०२,४४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०४ रुपयांनी वाढले आहेत. ८ग्रॅम सोन्याची किंमत आज ८१,९५२ रुपये आहे. तर १० तोळे सोन्याचे दर १०,२४,४०० रुपये आहेत. या दरात ३८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ३५० रुपयांनी वाझले आहेत.प्रति तोळ्यामागे ग्राहकांना ९३,९०० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७५,१२० रुपये आहे. १० तोळा सोन्याचे दर ३,५०० रुपयांनी महागले आहे. हे दर ९,३९,००० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर २८० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे तुम्हाला ७६,८३० रुपये मोजावे लागणार आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१,४६४ रुपये आहेत. या दरात २२४ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ७,६८,३०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khekda Bhaji Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत खेकडा भजी, मुसळधार पावसात करा चटपटीत नाश्ता

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

नाशिक रिंगरोडची अलाईनमेंट बदलली? IAS अधिकाऱ्यांची होणार चौकशी, खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकारचा निर्णय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

SCROLL FOR NEXT