Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: दिवाळीआधी सराफा बाजारात उलथापालथ, सोनं २००० रूपयांनी झालं स्वस्त, सुवर्णनगरीत १ तोळ्याचे भाव किती?

Jalgaon Gold Rate Today: आज सुवर्णनगरीत सोन्याचे दर घसले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २००० रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान, सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी चांदीचे दर वाढत आहेत.

Siddhi Hande

जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले

प्रति तोळ्यामागे २००० रुपयांची घसरण

सोन्याचे दर घसरले मात्र चांदी महागली

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहेत. दरम्यान, आज सोन्याच्या दरात दोन हजारांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर जरी घसरले असले तरीही चांदीचे दर वाढले आहेत. जळगावातील सराफा बाजारपेठेतील सोने-चांदीचे दर समोर आले आहे. यानुसार सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

गुंतवणूकदारांमुळे चांदीच्या भाव वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने अनेकजण चांदीच्या लहान लहान वस्तू खरेदी करत आहेत. त्यामुळे आता चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जळगावातील सोन्याचे दर किती झालेत ते जाणून घ्या.

आजचे सोन्याचे दर (TodayGold Rate)

सोने २२ कॅरेट (Gold 22k ) 110190 रुपये

सोने २४ कॅरेट (Gold 24k) 121200रुपये

चांदी (प्रति किलो) (Silver Rate) 167000

दिवाळीआधी सोन्याचे दर घसरले

ऐन दिवाळीच्या आधी सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २००० रुपयांची घसरण म्हणजेच १० तोळ्यामागे जवळपास २० हजारांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर वाढत होते त्यामुळे ग्राहकांनी चांदी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे चांदीचे दरदेखील वाढत आहे. आता सोन्याच्या दरातील ही घसरण अशीच व्हावी, अशी आशा ग्राहकांना आहे.

गुडरिटर्न्सनुसार, सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,८६० रुपयांनी घसरले आहेत. आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,२२,२९० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,७०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर सध्या १,१२,१०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचे दर १,३९० रुपयांनी कमी झाले असून हे दर ९१,७२० रुपये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wall Stain: डाग अच्छे है! मुलांनी भिंतीवर चित्र काढून भिंती खराब केल्या? 'या' सिंपल ट्रिक्सनं होतील साफ

Manache Shlok Movie Controversy: पुण्यातच मराठी चित्रपटाचा शो बंद पाडला; काय आहे कारण?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो केवायसी करा, नाहीतर... अजित पवारांची वॉर्निंग; Video

Maharashtra Live News Update: घायवळच्या जमिनी खरेदी-विक्री व्यवहाराची ४० प्रकरणं समोर

Maharashtra Politics : ठाकरेंच्या युतीत पवारांची एन्ट्री, पण महाविकास आघाडीचं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT