Gold Rate Prediction: सोनं ४०-५० हजारांनी होणार स्वस्त? पण कधी? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

Gold Rate Decrease Prediction: सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती बदलल्यानंतर सोन्याच्या दरात कपात होऊ शकते. यामागची कारणे आता समोर आली आहेत.
Gold Rate Prediction
Gold Rate PredictionSaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर कमी होणार?

सोन्याच्या दरात ४० टक्क्यांनी कपात होणार

सोन्याचे दर घसरण्यामागची कारणे

सोन्याचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत आहेत. सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोन्यासोबतच चांदीलाही चकाकी आली आहे. सोन्याच्या दरात एकाच दिवसात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सध्या सोन्याचे दर प्रति तोळा १,१९,५२२ रुपये झाले आहेत. दरम्यान, चांदीचे दर १,४७,६७५ रुपये प्रति किलो आहेत. सोन्याच्या भावात आता कपात होऊ शकते, याबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे.

Gold Rate Prediction
EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

सोन्याचे दर का वाढलेत?

सोन्याचे भाव वाढण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे हे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेकजण शेअर मार्केटमधून पैसे काढून सोने खरेदीसाठी वापरत आहेत. याचसोबत यूएस सरकारच्या शटडाउनचा परिणाम जगभरातील आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता आहे.याचा परिणाम सोन्यावरदेखील झाला आहे.

सोन्याचे दर घसरणार? (Gold Rate Will Fall)

सोन्याच्या वाढत्या दरावर तज्ज्ञांनी मत मांडले आहे. सोन्याच्या दरात कपात होऊ शकते.२१ सप्टेंबर रोजी एक इव्हेंट झाला होता. त्यामुळे जेपी मॉर्गन कंपनीने याबाबत माहिती दिली होती. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनी सांगितले की, सोन्याचे दर कधीही कमी होऊ शकतात.सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. परंतु ही वाढ काही काळापुरती मर्यादित आहे. त्यांनी सांगितले की, सोम्याचे दर ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतात. याचसोबत ICICI प्रूडेंशियलनेदेखील सोन्याचे दर घसरणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Gold Rate Prediction
Gold Rate Today: खुशखबर! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

सोन्याचे दर का घसरणार? (Gold Rate Decrease Reasons)

सिटी रिसर्चच्या रिपोर्टनुसार, सोन्यासाठी लोकांचे असलेले आकर्षण कमी झाले आहे. सध्या सोने खरेदी करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.दरम्यान, सोन्याची मागणी कमी झाल्यानंतर हे दर घसरू शकतात. तसेच जगात ज्या देशांमध्ये युद्ध सुरु आहे ते कमी झाल्यानंतरही या किंमती कमी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तणाव कमी झाल्यानंतर सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.

Gold Rate Prediction
Tarrif: अमेरिकेचा भारताला धक्का! अतिरिक्त २५% टॅरिफ आजपासून लागू; या व्यवसायांवर होणार परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com